
उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांचे सावत्र भाऊ नोएल टाटा यांची टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. या पार्श्वभूमीवर एका कारचा फोटो व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, “नोएल टाटा यांनी नॅनोचे नवीन मॉडल लाँच करण्याची घोषणा केली.”
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल फोटो बनावट आहे. टाटा कंपनीने नॅनोचे नवीन मॉडल लाँच करण्याची घोषणा केली नाही.
काय आहे दावा ?
व्हायरल फोटोमध्ये दिवंगत रतन टाटा आणि एका कारचे फोटो दिसते. सोबत ग्राफिकमध्ये लिहिले होते की, “टाटा नॅनो नव्या रूपात ग्राहकांपर्यत पोहोचणार.”
युजर्स हा फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “दिवंगत रतन टाटा यांचा सर्वात महत्वाकांक्षी प्रकल्प “टाटा नॅनो” परत आल्याच्या बातम्यांनी वेग पकडला आहे. वृत्तानुसार, नोएल टाटा यांच्या नेतृत्वाखाली टाटा मोटर्स लवकरच नवीन नॅनो लाँच करणार आहे. ही कार आता आधुनिक डिझाइन, उत्तम कामगिरी आणि उत्कृष्ट मायलेजसह बाजारात येईल. नवीन आवृत्तीमध्ये अपग्रेड केलेले 624cc पेट्रोल इंजिन असेल, जे 30 kmpl पर्यंत मायलेज देईल. नॅनोचे स्टायलिश लूक आणि कॉम्पॅक्ट डिझाईन शहरी ड्रायव्हिंगसाठी योग्य आहे.”
मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
सर्वप्रथम टाटा कंपनीने अशी कोणती घोषणा केला असती तर ही मोठी बातमी ठरली असती. परंतु, अशी कोणतीही बातमी टाटा कंपनीच्या सोशल मीडिया माध्यमावर दिसत नाही.
या उलट रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल फोटो टाटा कंपनीच्या नॅनो कारचा नाही.
हग बोगन मोटर्स नामक युट्यूब चॅनलने 15 ऑगस्ट 2023 रोजी व्हायरल फोटोमधील कारचा व्हिडिओ शेअर केला होता.
व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये कारचे नाव लिहिले होते की, “टोयोटा कंपनीचे आयगो – एक्स प्लस कार”
मूळ पोस्ट – युट्यूब
हा धागा पकडून अधिक सर्च केल्यावर टोयोटा कंपनीच्या वेबसाउईटवर व्हायरल फोटोशी मिळतीजुळती कार आढळली.
टोयोटा कंपनी
टोयोटा मोटर कॉर्पोरेशन ही एक जपानी बहुराष्ट्रीय ऑटोमोटिव्ह उत्पादक कंपनी आहे. या कंपनीची स्थापना किचिरो टोयोडा यांनी 28 ऑगस्ट 1937 रोजी केली होती. अधिक माहिती येथे वाचू शकतो.
खालील तुलनात्मक फोटो पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल की, टोयोटा आयगो – एक्स कारच्या फोटोला एडिट करुन टाटा कंपनीचा लोगो आणि नॅनो नावाची पाटी लावली आहे.
टाटा आणि टोयोटा या दोन्ही कंपन्याच्या लोगोमधील फरक खालील तुलनात्मक फोटोमध्ये दाखवला आहे.
निष्कर्ष
यावरुन सिद्ध होते की, व्हायरल फोटो एडिट केलेला आहे. मूळात हा फोटो टाटाच्या नॅनोचा नसून टोयोटा कंपनीच्या ‘आयगो – एक्स’ कारचा आहे. नोएल टाटा किंवा टाटा कंपनीने अद्याप नॅनोचे नवीन मॉडल लाँच करण्याबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही. खोट्या दाव्यासह फोटो शेअर केला जात आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:नोएल टाटा यांनी नॅनो कारचे नवीन मॉडेल लाँच केले नाही; एडिटेड फोटो व्हायरल
Written By: Sagar RawateResult: Altered
