उत्तराखंडमध्ये लष्करी हेलिकॉप्टरला ‘पोकलँड मशीन’ बांधून नेण्याचा फोटो फेक; वाचा सत्य

Altered Social

एका हेलिकॉप्टरला जेसेबी अर्थात पोकलँड मशीन बांधून नेतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, उत्तराखंडमधील धारली गावाला मदत करण्यासाठी भारतीय लष्करीने हेलिकॉप्टरला ‘पोकलँड मशीन’ बांधून नेण्यात आली आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल फोटो बनावट आहे.

काय आहे दावा ?

व्हायरल फोटोमध्ये भारतीय हवाई दलाचे हेलिकॉप्टर आणि त्याला जोडलेले ‘पोकलँड मशीन’ दिसते.

युजर्स हा फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “ हो चित्र खरे आहे. उत्तराखंडमध्ये ढगफुटीमुळे थरली गावाचा संपर्क तुटला होता. रस्ता अडवल्यामुळे मदतकार्य सुरू करण्यासाठी आवश्यक असलेले पोकलँड रस्ताने वाहून नेणे शक्य झाले नाही, म्हणून “पूर्ण पोकलँड,हो पूर्ण पोकलँड” चिनूक हेलिकॉप्टरला बांधून मदत आणि बचाव कार्यासाठी घटनास्थळी नेण्यात आले.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

कीव्हर्ड सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल फोटोमधील भारतीय हवाई दलाचे चिनूक हेवी-लिफ्ट हेलिकॉप्टर असून उत्तराखंडमध्ये बचाव कार्यात वापरले गेले होते. 

परंतु, कोणत्याही अधिकृत माध्यमांवर चिनूक हेलिकॉप्टरला ‘पोकलँड मशीन’ बांधून उत्तराखंडमध्ये नेल्याचा उल्लेख आढळत नाही.

पुढे रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर झी न्यूजने 6 मे 2022 रोजी व्हायरल फोटोमधील चिनूक हेलिकॉप्टरचा अचूक फोटो शेअर केल्याचे आढळले. परंतु, यामध्ये हेलिकॉप्टरला जेसीबी नव्हे तर ‘हॉवित्झर तोफ’ जोडली होती. हाच फोटो आपण येथेयेथे पाहू शकता.

पोकलँड मशीन

पुढे अधिक सर्च केल्यावर व्हायरल फोटोमधील पोकलँड मशीनशी मिळताजुळता फोटो ‘ट्रेलब्लेझर्स कन्स्ट्रक्शन्स’ नामक वेबसाईटवर आढळला.

मूळ पोस्ट – ट्रेलब्लेझर्स कन्स्ट्रक्शन्स

पुन्हा एकदा रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल फोटोमध्ये दाखवलेली जागा उत्तराखंडमधील धारली बाजार परिसर आहे.

मूळ पोस्ट – हिंदूस्तान टाइम्स

खालील तुलनात्मक फोटो पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल व्हायरल फोटो बनावट आहे.

उत्तराखंड पोलिसांनीदेखील हा फोटो बनावट असल्याचे स्पष्ट केले. 

खरे चित्र

उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यात 6 ऑगस्ट रोजी आलेल्या विनाशकारी पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आणि शेकडो रहिवासी पर्यटक अडकून पडले आहेत. सरकारणे बचाव आणि पुनर्संचयित कार्य सुरु केली आहे. 

तसेच 7 ऑगस्ट रोजी भारतीय हवाई दलाचे चिनूक हेलिकॉप्टरने आपत्तीग्रस्त भागात जनरेटर सेट एअरलिफ्ट केले होते.

या मोहिमेत चिनूकसोबत एमआय-17 व्ही5 आणि एएलएच हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले आहे.ज्यामुळे आत्तापर्यंत 123 नागरिकांची यशस्वी सुटका झाली आणि ४ टन आवश्यक मदत साहित्य पोहोचवण्यात आले. अधिक महिती येथे, येथेयेथे वाचू शकता.

मूळ पोस्ट – लोकसत्ता

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, व्हायरल होत असलेला फोटो बनावट आहे. मुळेत हा फोटो 2020 सालचा असून यामध्ये भारतीय हवाई दलाचे चिनूक हेवी-लिफ्ट हेलिकॉप्टर ‘हॉवित्झर तोफ’ वाहून नेत होते. खोट्या दाव्यासह फोटो व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम ट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:उत्तराखंडमध्ये लष्करी हेलिकॉप्टरला ‘पोकलँड मशीन’ बांधून नेण्याचा फोटो फेक; वाचा सत्य

Fact Check By: Sagar Rawate  

Result: Altered


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *