राष्ट्रगीत विसरणारे हे लोक भाजपचे नसून ‘सपा’चे खासदार व कार्यकर्ते आहेत?

दिशाभूल करणाऱ्या I Misleading राजकीय | Political

प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरात ध्वजारोहण करण्यात आले. याच पाश्वभूमीवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये काही जण ध्वजारोहणादरम्यान राष्ट्रगीत विसरतात. दावा केला जात आहे की, राष्ट्रगीत विसरणारे लोक भाजपचे पदाधिकारी आहेत.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ तीन वर्षांपूर्वीचा असून ध्वजारोहण करणारी व्यक्ती समाजवादी पार्टीचे खासदार आहेत.

काय आहे दावा ?

व्हायरल व्हिडिओमध्ये काही लोक ध्वजारोहण करताना राष्ट्रगीत गाताना शब्द विसरतात.

युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “आर एस एस संघटना प्रेरित भाजपच्या पदाधिकार्यांना साधं “राष्ट्रगीत” ही म्हणता येत नाही. पहा हा व्हिडिओ…!”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, झी न्यूजने हाच व्हिडिओ 16 ऑगस्ट 2021 रोजी युट्यूब चॅनलवर शेअर केला होता.

कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “सपा खासदार सय्यद तुफैल हसन स्वातंत्र्यदिनाच्या ध्वजारोहण सोहळ्यात सहभागी झाले आणि राष्ट्रगीत विसरले.”

जनसत्ताच्या बातमीनुसार, 2021 मध्ये 75 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त मुरादाबादचे खासदार डॉ. एस.टी. हसन यांनी गलशहीद पार्क येथे आयोजित कार्यक्रमात उपस्थित असलेल्या लोकांना संबोधित केले आणि ध्वजारोहण केले. 

ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत सुरू होताच, त्याच्यासोबत उभे असलेले लोक राष्ट्रगीत विसरले. डॉ. हसन हे देखील राष्ट्रगीत गाऊ शकले नाही आणि ते खूप अस्वस्थ झाले. पुढे त्याच्यांसोबत उभ्या असलेल्या इतर लोकांनी ‘जय हे, जय हे’ म्हणत राष्ट्रगीत संपवले.

डॉ. एस.टी. हसन स्पष्टीकरण

व्हिडिओ व्हायरल झाल्यावर डॉ. हसन स्पष्टीकरण देतात की, “राष्ट्रगीत सादर करणारा गट हा दुसरा होता. आम्ही फक्त त्यांच्या सुरामध्ये सूर मिसळत होतो. त्या गटाने राष्ट्रगीत गाण्यात चूक केल्यावर मी त्यांना रोखले. उर्वरित लोकांनी राष्ट्रगीत पूर्ण केले आणि आम्ही पुढील कार्यक्रमासाठी निघालो.” 

तसेच, या ठिकाणी डॉ. हसन यांनी राष्ट्रगीत गाऊन दाखवले.

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओमध्ये ध्वजारोहण करणारे भाजपचे पदाधिकारी नाही. ते समाजवादी पार्टीचे खासदार डॉ. सय्यद तुफैल हसन आणि त्यांचे कार्यकर्ते होते. भ्रामक दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:राष्ट्रगीत विसरणारे हे लोक भाजपचे नसून ‘सपा’चे खासदार व कार्यकर्ते आहेत?

Written By: Sagar Rawate  

Result: Misleading