नाटकात मुस्लिम पात्रावर झालेला हल्ल्याचा व्हिडिओ चुकीच्या धार्मिक संदर्भात व्हायरल

Missing Context Social

एका व्हिडिओमध्ये मुस्लिम व्यक्ती मंचावर 100 कोटी हिंदूंना मुस्लिम बनविण्याबाबत बोलतो आणि त्याच्यावर एक व्यक्ती हल्ला करताना दिसतो.

दावा केला जात आहे की, “ व्हिडिओमधील व्यक्ती मुस्लिम असून जेव्हा तो स्टेजवर हिंदूंना मुस्लिम बनविण्याबाबत बोलतो तेव्हा उपस्थित हिंदूंनी त्याला मारहाण केली.”

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओमधील व्यक्ती हिंदू असून तो रंगमंचावर मुस्लिम व्यक्तिरेखा साकारत होता.

काय आहे दावा ?

हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “मी 100 कोटी हिंदूंना मुस्लिम बनवेन असे सर्वांसमोर आव्हान दिल्यावर एका ठाकुरच्या मुलाने त्याचा अहंकार मोडला.”

मूळ पोस्ट – ट्विटर | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओमधील घटना 11 सप्टेंबर रोजी ओडिशातील एका नाटकादरम्यानचा आहे.

हा धागा पकडून अधिक सर्च केल्यावर केल्यावर कळाले की, ओडिशातील संबलपूर जिल्ह्यात एका नाटकाच्या दृश्यात एक मुस्लिम व्यक्तिरेखा साकारणारा माणूस दुसऱ्या व्यक्तिरेखेचे ​​इस्लाममध्ये धर्मांतर करण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो की, “मी सर्व हिंदूंना मुस्लिम बनवीन.” पुढे हे वक्तव्य एकून प्रेक्षकांमधील एका व्यक्तीने त्या नटाला मारहाण केली.

या घटनेनंतर व्हिडिओमधील मुस्लिम व्यक्तिरेखा साकारणाऱ्या व्यक्तीची मानस जेना ऑफिशियल या युट्यूब चॅनलने मुलाखत घेटली.

या नटाचे नाव नवकिशोर घोष असून तो हिंदू आहे. व्हायरल व्हिडिओमधील प्रसंगाविषयी प्रश्न विचारल्यावर नवकिशोरने सांगितले की, “प्रेक्षक माझ्यासाठी देवास्थानी आहेत आणि त्यांच्याकडून असा प्रतिसाद मिळणे हा एक अभिनेता म्हणून माझ्यासाठी खूप मोठा पुरस्कार आहे.”

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओमधील व्यक्ती मुस्लिम नसून हिंदू आहे. ओडिशातील संबलपूर जिल्ह्यात एका नाटकादरम्यान एका मुस्लिम व्यक्तिरेखा साकारणाऱ्या हिंदू नटाला मारहाण करण्यात आली होती. हा व्हिडिओ चुकीच्या धार्मिक संदर्भात शेअर केला जात आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:नाटकात मुस्लिम पात्रावर झालेला हल्ल्याचा व्हिडिओ चुकीच्या धार्मिक संदर्भात व्हायरल

Written By: Sagar Rawate  

Result: Misleading