कोविड-19 जीवाणूंमुळे होत असल्याचा खोटा मेसेज सिंगापूरच्या नावावर व्हायरल

False Social

देशभरात पुन्हा एकदा करोनाबाधित (कोव्हिड-19) रुग्ण आढळत आहेत. याच पार्श्वभूमीवर एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दावा केला जात आहे की, सिंगापूरने पोस्टमार्टमद्वारे सिद्ध केले की, कोविड-19 हा जीवाणूंमुळे होतो.”

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा मेसेज आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल मेसेज खोटा असून सिंगापूरने असा कोणताही दावा केला नाही.

काय आहे दावा ?

व्हायरल मेसेजमध्ये लिहिले आहे की, “कोविड-१९ च्या मृतदेहाचे शवविच्छेदन (पोस्टमार्टम) करणारा सिंगापूर हा जगातील पहिला देश बनला आहे. सखोल तपासणीनंतर असे आढळून आले की कोविड-१९ हा विषाणू म्हणून अस्तित्वात नाही, तर तो एक जीवाणू आहे जो किरणोत्सर्गाच्या संपर्कात आला आहे आणि रक्तात गोठून मानवी मृत्यूला कारणीभूत ठरतो.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम सिंगापूरने करोनाबाबत अशी कोणतीही घोषणा केली असती तर ही मोठी बातमी ठरली असती. परंतु, अशी कोणती बातमी अधिकृत माध्यामांवर आढळली नाही.

कीव्हर्ड सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल मेसेज खोटा असून 2020 – 21 पासून माध्यमांवर उपलब्ध आहे.

माध्यामांनी 2021 मध्ये सिंगापूरच्या आरोग्य मंत्रालयालाच्या नावाने व्हायरल होत असलेला संदेश खोटा असल्याचे स्पष्ट केले की, “सिंगापूरने असे शवविच्छेदन केलेले नाही. संदेशात कोविड-19 संसर्गाच्या पॅथोफिजियोलॉजीबद्दल चुकीची माहिती दिली आहे.” 

अधिक महिती येथेयेथे वाचू शकता.

मूळ पोस्ट – टू डे | मदरशिप

सिंगापूर आरोग्य मंत्रालयाचे स्पष्टीकरण

व्हायरल मेसेजचे खंडण करताना सिंगापूरच्या आरोग्य मंत्रालय 7 जून 2021 रोजी फेसबुकवर पोस्ट शेअर करताना लिहितात की, “सिंगापूरने कोविड-19 रुग्णाचे शवविच्छेदन (पोस्टमार्टम) केले आणि उपचार पद्धतींमध्ये बदल केला आहे. अशा संदेशाची आम्हाला माहिती आहे. ही माहिती सिंगापूरच्या आरोग्य मंत्रालयाला देण्यात आली आहे. हे खरे नाही.अर्थात कोविड-19 हा जीवाणूजन्य आजार असल्याचा दावा बनावट आहे.

मूळ पोस्ट – फेसबुक

जागतिक आरोग्य संघटनेने असेही स्पष्ट केले आहे की, “कोविड-१९ हा विषाणूमुळे होतो, कोणत्याही जीवाणूमुळे नाही. “कोविड-19 ला कारणीभूत असलेला विषाणू कोरोनाविरिडे नावाच्या विषाणूंच्या कुटुंबात आहे. अँटीबायोटिक्स विषाणूंविरुद्ध काम करत नाहीत. कोविड-19 मुळे आजारी पडणाऱ्या काही लोकांना गुंतागुंत म्हणून बॅक्टेरियाचा संसर्ग देखील होऊ शकतो. या प्रकरणात, आरोग्य सेवा प्रदात्याकडून अँटीबायोटिक्सची शिफारस केली जाऊ शकते.”

मूळ पोस्ट – जागतिक आरोग्य संघटना

कोविड-19 हा आजार SARS-CoV-2 नावाच्या विषाणूमुळे होतो, असा निष्कर्ष अनेक आंतरराष्ट्रीय आरोग्य संस्था आणि रुग्णालयांनी स्पष्टपणे मांडलेला आहे. अधिक माहिती येथे, येथेयेथे वाचू शकता.

तसेच आम्हाला कुठेही असं वैज्ञानिक आधार सापडलेला नाही की कोविड-19 हा जीवाणूजन्य (bacterial) आजार आहे. तो एक विषाणूजन्य (viral) संसर्ग असल्याचे स्पष्ट आहे.

शिवाय, जागतिक आरोग्य संघटनेने कोविडग्रस्त मृत व्यक्तींवर शवविच्छेदन करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केलेली आहेत. त्यामुळे शवविच्छेदनावर कोणतेही आंतरराष्ट्रीय स्तरावर बंदीचे नियम नाहीत, हे देखील स्पष्ट होते.

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, सिंगापूर आरोग्य मंत्रालयाने व्हायरल मेसेज खोटा असल्याचे स्पष्ट केले. तसेच जागतिक आरोग्य संघटनेद्वारे कोविड-19 हा जीवाणूजन्य आजार नसून तो एक विषाणूजन्य संसर्ग असल्याचे स्पष्ट करण्यात आले. खोट्या दाव्यासह हा मेसेज व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:कोविड-19 जीवाणूंमुळे होत असल्याचा खोटा मेसेज सिंगापूरच्या नावावर व्हायरल

Fact Check By: SAGAR RAWATE 

Result: False


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *