तीन मुलींना वाचवण्याचा स्क्रिप्टेड व्हिडिओ अपहरणाची खरी घटना म्हणून व्हायरल

False Social

एका तरुणाद्वारे घरातून तीन बंदिस्त मुलींना वाचवतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दावा केला जात आहे की, “हिंदू महिलांना नोकरीचे आमिष दाखवून अपहरण करणाऱ्या विशिष्ट समुदायाच्या लोकांच्या घरातून दिल्लीतील एका तरुणाने 3 बंदिस्त मुलींना वाचवले.”

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ स्क्रिप्टेड असून त्यात दाखविलेली घटना सत्य नाही.

काय आहे दावा ?

व्हायरल व्हिडिओमध्ये एका घरात तरुण जातो आणि दुसऱ्या तरुणाला चांगला चोप देते कपाटात डांबून ठेवलेल्या 3 मुलींना वाचवताना दिसतो.

युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, दिल्लीत, परदेशातील कॉल सेंटरमध्ये जॉब प्लेसमेंटच्या नावाखाली, काही तथाकथित लोक जे स्वत: विशिष्ट समुदायाचे आहेत ते नोकरी सल्लागार एजन्सी चालवतात, ज्यामध्ये ते फक्त हिंदू मुली आणि महिलांना नोकरीच्या बहाण्याने बोलावतात आणि त्या सर्वांना विकतात. अरब देशांना. आजकाल हिंदू समाजातील मुली पाश्चिमात्य संस्कृतीच्या नशेत आहेत, त्यामुळे आज दिल्लीत एका सुसंस्कृत तरुणाने दिल्लीतच एका घरातून 3 मुलींना बाहेर काढले.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओ स्क्रिप्टेड आहे.

नवीन जांगरा नामक युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ 12 ऑक्टोबर 2023 रोजी शेअर केला होता.

या व्हिडिओमध्ये 0:22 मिनिटावर डिस्क्लेमर दिले आहे की, हा व्हिडिओ केवळ मनोरंजनासाठी बनवण्यात आला आहे.

अधिक तपास केल्यावर कळाले की, नवीन जांगरा याने आपल्या युट्यूब चॅनलवर व्हायरल व्हिडिओ प्रमाणे अनेक स्क्रिप्टेड कंटेंट अपलोड केलेले आहेत.

नवीन जांगरा याच्या यूट्यूब चॅनलवर त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटची लिंक दिलेली आहे. त्याने आपल्या इंस्टाग्राम पेजच्या बायोमध्ये आपण व्हिडिओ क्रिएटर असल्याचे नमूद केले आहे.

निष्कर्ष 

यावरुन सिद्ध होते की, व्हायरल होत असलेला व्हिडिओ स्क्रिप्टेड असून नवीन जांगरा नामक युट्यूबरने बनवलेला आहे. ही खरी घटना समजून भ्रामक दाव्यासह हा व्हिडिओ शेअर केला जात आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:तीन मुलींना वाचवण्याचा स्क्रिप्टेड व्हिडिओ अपहरणाची खरी घटना म्हणून व्हायरल

Written By: Sagar Rawate 

Result: False