
एबीपी माझा या वेबसाईटचे ग्राफिककार्ड वापरून दावा केला जात आहे की, खासदार संजय राऊत यांनी आपल्याच पक्ष प्रमुखाचा घरचा आहेर देत “उद्धव ठाकरे हे काहीही बोलतील त्यांच्यावर विश्वास ठेऊ नका त्यांना मानसोपचार तज्ज्ञांची गरज आहे.” असे म्हटले.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल ग्राफिक बनावट असून खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंविरोधात असे कोणतेही वक्तव्य केलेले नाही.
काय आहे दावा ?
खासदार संजय राऊत यांचा फोटो आणि एबीपी माझा वेबसाईटचा लोगो असणाऱ्या व्हायरल ग्राफिकमध्ये लिहिलेले आहे की, “उद्धवजी हे काहीही बोलतील त्यांच्यावर जास्त विश्वास ठेऊ नका, त्यांना मानसोपचार तज्ज्ञांची गरज – संजय राऊत.”

मूळ पोस्ट – फेसबुक
तथ्य पडताळणी
संजय राऊत यांनी असे विधान केले असते तर नक्कीच मोठी बातमी झाली असती. परंतु, राऊत यांनी उद्धव ठाकरेंवर असे कोणतेही विधान केल्याची बातमी कुठेच आढळली नाही.
तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवर आणि त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर देखील हे ग्राफिक आढळले नाही.
या उलट एबीपी माझाच्या वेबसाईटवर असणारे ग्राफिक कार्ड आणि व्हायरल ग्राफिक कार्डमध्ये फरक आढळला.
पुढे फॅक्ट क्रेसेंडोने एबीपी माझाचे सोशल मीडिया प्रमुख मेघराज पाटील यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी सांगितले की, “व्हायरल ग्राफिक बनावट असून एबीपी माझाने अशी कोणतीही बातमी दिलेली नाही.”
वरील ग्राफिक आणि व्हायरल ग्राफिक यांची तुलना केल्यावर आपल्या लक्षात येईल की, संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंवर कोणतीही वक्तव्य केले नाही. ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसवर टीका करत होते.

एबीपी माझाच्या बातमीनुसार “उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काहीही बोलतील त्यांच्यावर जास्त विश्वास ठेऊ नका. हे सगळे मनोरुग्ण असून त्यांना मानसोपचार तज्ज्ञांची गरज आहे. मोदींपासून फडणवीसांपर्यंत सगळे एकजात खोटारडे आहेत.” अशी घणाघाती टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली होती.
निष्कर्ष
यावरून सिद्ध होते की, व्हायरल ग्राफिक बनावट असून खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंविरोधात विरोधात असे कोणतेही वक्तव्य केले नाही. ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसवर टिका करत होते.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:उद्धव ठाकरेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज आहे, असे संजय राऊत म्हटले का ? वाचा सत्य
Fact Check By: Sagar RawateResult: Altered
