
केंद्र सरकारने जानेवारी महिन्यात प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा केली होती. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांच्या नावाने एक ग्राफिक व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना पद्मश्री पुरस्कार देण्याची मागणी केली आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे ग्राफिक आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल ग्राफिक बनावट आहे.
काय आहे दावा ?
व्हायरल ग्राफिकमध्ये संजय राऊत यांचा फोटो आणि सकाळचा लोगो दिसतो. ग्राफिकमध्ये लिहिले होते की, “उद्धव ठाकरे यांनाही पद्मश्री पुरस्कार द्या; संजय राऊत ची मागणी – संजय राऊत.”
मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
संजय राऊत यांनी असे विधान केले असते तर नक्कीच मोठी बातमी ठरली असती. परंतु, राऊत यांनी अशी कोणती मगणी केल्याची बातमी माध्यमांमध्ये आढळत नाही.
तसेच सकाळच्या वेबसाईटवर आणि त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर देखील हे ग्राफिक आढळत नाही.
याउलट सकाळच्या फेसबुक अकाउंटवर असणारे ग्राफिक कार्ड आणि व्हायरल ग्राफिक कार्डमध्ये फरक आढळला.
सैफ अली खानवर हल्ला झाल्यावर संजय राऊत यांनी सरकारवर निशाना साधला होता. तेव्हा सकाळने हुबेहुब ग्राफिक शेअर केले होते.
पद्म पुरस्कारांची घोषणा
केंद्र सरकारने 25 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा केली होती. राष्ट्रपतींनी एकूण 139 दिग्गजांची यादी जाहीर केली आहेत. यामध्ये सात पद्म विभूषण, 19 पद्मभूषण आणि 113 जणांना पद्मश्री पुरस्कार प्रदान केला जाणार आहेत.
या यादीत महाराष्ट्रातील तीन पद्मभूषण आणि 11 पद्मश्री पुरस्कार दिग्गजांना जाहीर करण्यात आले आहेत. अधिक माहिती येथे वाचू शकता.
खालील यादीत महाराष्ट्रातील पद्म पुरस्कर्त्यांची नावे पाहू शकता.
निष्कर्ष
यावरुन सिद्ध होते की, व्हायरल ग्राफिक बनावट असून संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना पद्मश्री पुरस्कार देण्याची मागणी केली नव्हती. खोट्या दाव्यासह बनावट ग्राफिक व्हायरल होत आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना पद्मश्री पुरस्कार देण्याची मागणी केली नाही; वाचा सत्य
Written By: Sagar RawateResult: Altered
