
सध्या सोशल मीडियावर दोन फोटो व्हायरल होत आहेत. एका फोटोमध्ये डोक्यावर खलबत्ते आणि हातात चिमुकले बाळ घेतलेली महिला दिसते. तर दुसऱ्या फोटोमध्ये पोलिस गणवेशात एक महिला दिसते. दावा केला जात आहे की, “दोन्ही फोटोमधील महिला पोलिस उपनिरीक्षक पद्मशीला तिरपुडे असून त्यांनी एमपीएससी उत्तीर्ण होण्याआधी संघर्षाच्या काळात पाटा – वरवंटा, खलबत्ता विकले होते.”
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल फोटोसोबत केलेला खोटा असून डोक्यावर खलबत्ते घेतलेली महिला पद्मशीला तिरपुडे नाही.
काय आहे दावा ?
व्हायरल व्हिडिओमध्ये एक महिला डोक्यावर खलबत्ते आणि हातात चिमुकले बाळ घेतलेली दिसते. तर दुसऱ्या फोटोमध्ये पोलिस गणवेशात एक महिला दिसते.
ग्राफिकमध्ये लिहिले होते की, “या आहेत पद्मशीला तिरपुडे.. पाटा – वरवंटा, खलबत्ता विकत विकत एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन पोलिस उपनिरीक्षक झाली.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
कीव्हर्ड सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल फोटोसोबत केलेला दावा खोटा असून 2020 पासून सोशल मीडियावर उपलब्ध आहे.
दैनिक महाराष्ट्र टाईम्सने 23 ऑक्टोबर 2020 रोजी एका बातमीसोबत व्हायरल व्हिडिओमधील पोलिस गणवेश घातलेली महिलेचो फोटो शेअर केलेला दिसतो.
फोटोसोबत दिलेल्या बातमीत पद्मशीला तिरपुडे यांनी हे छायाचित्र आपले नसल्याचे स्पष्ट केले. तसेच आपला जीवनप्रवास मांडताना त्या म्हणाल्या की, “मी खूप संघर्ष केला पण मी खलबत्ते, वरवंटे विकण्याचे काम कधीच केले नाही.”

मूळ पोस्ट – महाराष्ट्र टाईम्स
पुढे आमच्या कीव्हर्ड सर्चमध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातने प्रकाशीत केलेल्या यशोगाथा मसिकेत पद्मशीला तिरपुडे यांचा जिवनप्रवास दिला आहे. यामध्येदेखील पद्मशीला तिरपुडे यांनी एमपीएससी उत्तीर्ण होण्याआधी संघर्षाच्या काळात पाटा – वरवंटा, खलबत्ता विकल्याचा कोणताही उल्लेख नाही.
खंडण
शेवटी फॅक्ट क्रेसेंडोने पोलिस उपनिरीक्षक पद्मशीला तिरपुडे यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी व्हायरल दाव्याचे खंडण करत स्पष्ट केले की, “व्हायरल होत असलेला फोटो माझा नाही. मी आयुष्यात कधीही खलबत्ते आणि वरवंटे विकले नाही.”
निष्कर्ष
यावरुन सिद्ध की, व्हायरल फोटोमध्ये डोक्यावर खलबत्ते आणि हातात चिमुकले बाळ घेतलेली महिला पोलिस उपनिरीक्षक पद्मशीला तिरपुडे नाही. भ्रामक दाव्यासह फोटो व्हायरल होत आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:संघर्षाच्या काळात पोलिस उपनिरीक्षक पद्मशीला तिरपुडेंनी खलबत्ते विकले का ? वाचा सत्य
Fact Check By: SAGAR RAWATEResult: Misleading
