
सध्या रमजानचा महिना सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, यामध्ये पवन कल्याण इफ्तार पार्टी करत आहेत.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ 6 वर्षांपूर्वीचा असून आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीदरम्यानचा आहे.
काय आहे दावा ?
व्हायरल व्हिडिओमध्ये पवन कल्याण काही मुस्लिम लोकांसोबत जेवण करताना दिसतात.
युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “तामिळ सुपरस्टार विजय इफ्तार पार्टी मध्ये गेला म्हणून त्याला ट्रोल करत आहे. त्यांच्या माहितीसाठी आंध्रप्रदेशचा उपमुख्यमंत्री पवन कल्याणचा हा व्हिडीओ.”
मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओ 6 वर्षांपूर्वीचा आहे.
जीएनएन टीव्ही तेलुगु या युट्यूब चॅनलने 25 मार्च 2019 रोजी हाच व्हिडिओ शेअर केला होता.
कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “पवन कल्याण एका मुस्लिम मित्राच्या घरी बिर्याणी खाताना”
अधिक सर्च केल्यावर द हंस इंडियाच्या वेबसाइटवर व्हायरल व्हिडिओमधील फोटो प्रकाशित केल्याचे आढळले. मथळामध्ये लिहिलेले होते की, “गुंटूरमध्ये निवडणूक प्रचारादरम्यान पवन कल्याणने कुराण आणि बिर्याणीचा आस्वाद घेतला.”
हा धागा पकडून अधिक सर्च केल्यावर पवन कल्याण यांच्या जनसेना पक्षा अधिकृत फेसबुक पेजवर हेच फोटो 25 मार्च 2019 रोजी शेअर केल्याचे आढळले.
कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “गुंटूर जिल्हाच्या दौऱ्यादरम्यान जनसेना अध्यक्ष पवन कल्याण यांनी गुंटूर पूर्व मतदारसंघातून जनसेना उमेदवार म्हणून निवडणूक लढवणारे शेख झिया उर रहमान यांच्या घरी भेट दिली.”
हा व्हिडिओ 2019 च्या रमजानचा का ?
व्हायरल व्हिडिओ 2019 सालच्या रमजानचा आहे का हे जाणून घेण्यासाठी कीव्हर्ड सर्च केल्यावर कळाले की, 2019 मध्ये 5 मे ते 3 जून या काळात रमजान सण साजरा करण्याला आला होता.
अर्थात व्हायरल व्हिडिओ रमजानशी संबंधित नाही.
निष्कर्ष
यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ 6 वर्षांपूर्वीचा असून इफ्तार पार्टीचा नाही. 2019 मध्ये पवन कल्याण आपल्या पक्षाच्या उमेदवाराच्या घरी बिर्याणीचा आस्वाद घेत होते. खोट्या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा जुना असंबंधित व्हिडिओ इफ्तार पार्टी म्हणून व्हायरल
Written By: Sagar RawateResult: False
