
नुकतेच राहुल गांधी यांनी नाशिकमध्ये सभा घेतली होती. यानंतर गर्दीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, व्हायरल व्हिडिओमधील गर्दी राहुल गांधी यांच्या नाशिक रॅलीदरम्यानची आहे.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ दोन वर्षांपूर्वीचा आहे.
काय आहे दावा ?
व्हायरल व्हिडिओमध्ये गर्दी आणि त्याखाली राहुल गांधींचा फोटो दिसतो. टाईम्स नाऊने हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, “राहुल गांधींची भारत जोडो यात्रा नाशिकमध्ये पोहचली असून नाशिकमध्ये या यात्रेला तुफान गर्दी दिसून आली.”
मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, गर्दीचा हा व्हिडिओ 2022 पासून सोशल मीडियावर उपलब्ध आहे.
काँग्रेसच्या अधिकृत काउंटवर हाच व्हिडिओ 16 डिसेंबर 2022 रोजी अपलोड केलेला आढळला. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “राजस्थानच्या दौसामध्ये भारत जुडत आहे आणि या यात्रेचा शंभरावा दिवस चालू आहे.”
हा धागा पकडुन अधिक सर्च केल्यावर कळाले की, हा व्हिडिओ राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा असून जेव्हा 100 व्या दिवशी अर्थात 15 डिसेंबर 2022 रोजी राजस्थानच्या दौसा येथे ही यात्रा पोहचली तेव्हा मोठ्या उत्साहाने जनसमुदायाने त्यांचे स्वागत केले होते.
काँग्रेसचे नेते आणि राजस्थान विधानसभा सदस्य सचिन पायल यांनी देखील हाच व्हिडिओ आपल्या अधिकृत ट्विटर अकाअंट वरून शेअर केला होता. कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “भारत जोडो यात्रेचा 100 व्या दिवशी दौसा मध्ये प्रवेश होताच, लोकांचा प्रतिसाद आणि सहभाग जबरदस्त होता!”
राहुल गांधी नाशिक यात्रा
राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील मणिपूर येथून 15 जानेवारीला निघालेली भारत जोडो न्याय यात्रा 13 मार्च रोजी नाशिक पर्यंत येऊन पोहचली होती. यादरम्यान राहुल गांधीनी त्र्यंबकेश्वर मंदिराला भेट दिली होती. अधिक महिती येथे वाचू शकता.
खालील व्हिडिओमध्ये आपण नाशिकमधील भारत जोडो न्याय यात्रेदरम्यानचा व्हिडिओ पाहू शकतो.
यात्रेचे समारोप
मणिपूरहून निघालेल्या राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’चे 17 मार्च रोजी दादरच्या छत्रपती शिवाजी पार्कवरील जाहीर सभेत समारोप झाला. शिवाजी पार्कवरील सभेच्या माध्यमातून काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या प्रचाराची सुरुवात केली गेली. या सभेसाठी ‘इंडिया’ आघाडीच्या अनेक नेत्यांना निमंत्रित करण्यात आले होते.
निष्कर्ष
यावरून सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ राहुल गांधी नाशिक न्याय यात्रेचा नाही. ही गर्दी 2 वर्षांपूर्वी राजस्थानच्या दौसामध्ये भारत जोडो यात्रेदरम्यानची आहे. भ्रामक दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:राजस्थानमधील जुना व्हिडिओ राहुल गांधींच्या नाशिक रॅलीतील गर्दी म्हणून व्हायरल
Fact Check By: Sagar RawateResult: Misleading
