शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींवरील लाठीचार्जचा जुना व्हिडिओ सध्याचा म्हणून व्हायरल

Social दिशाभूल करणाऱ्या I Misleading

शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, हा व्हिडिओ सध्याचा आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ सध्याचा नसून 9 वर्षांपूर्वीचा आहे.

काय आहे दावा ?

व्हायरल व्हिडिओमध्ये अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींवर पोसिल लाठीचार्ज केलेली दाखवले आहे.

युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “शंकराचार्यांना मारहाण ? काय सुरुये देशात ? पोलिसच मारत असतील तर कुणी कुणाला थांबवायचं ?”

मूळ पोस्ट – ट्विटर | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओ 9 वर्ष जुना आहे. 

आज तकने 24 सप्टेंबर 2015 रोजी या घटनेचा व्हिडिओ युट्यूबवर शेअर केला होता.

कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “वाराणसीमध्ये मूर्ती विसर्जनावरून स्थानिकांवर लाठीचार्ज.”

खालील व्हिडिओमध्ये 1 मिनिटानंतर आपण अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींवर पोलिस लाठीचार्ज करताना दिसतात.

अधिक सर्च केल्यावर कळाले की, 2015 मध्ये इलाहबाद उच्च न्यायालयाने वाराणसी मधील गंगा नदीमध्ये गणपतीची मूर्ती विर्जीत करण्यास बंदी घातली होती. तसेच न्यायालयाने सरकारला मूर्ती विसर्जनासाठी दुसरी व्यवस्था निर्माण करण्याचे आदेश दिले होते. या आदेशाचा विरोधात अनेकांनी विरोध दर्शवला काही ठिकाणी दगडफेकदेखील झाल्याने पोलिसांनी कलम 144 लागू केले होते. 

तसेच इलाहबाद उच्च न्यायालयाच्या या आदेशाविरोधात स्थानिक मंडळांनी, समित्यांनी, व्यापारी मंडळींनी आणि संत / संन्यासी आंदोलन केले. अशाच एका आंदोलनात अविमुक्तेश्वरानंद सरस्वती आणि काही सामान्य मंडळी या निर्णयाचा विरोध करत होती. तेव्हा त्यांच्यावर पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. अनेक धार्मिकांनी या घटनेचा विरोध केला होता. सविस्तर माहिती येथे, येथेयेथे वाचू शकता.

मूळ – न्यूज18 हिंदी

अखिलेश यादव

द पायनियर आणि दैनिक जागरणच्या वृत्तानुसार 2021 मध्ये समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी 2015 मध्ये वाराणसीमध्ये झालेल्या लाठीचार्जबद्दल शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद आणि त्यांचे शिष्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांची माफी मागितली.

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ सध्याचा नसून 9 वर्ष जुना आहे. 2015 मध्ये पोलिसांनी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींवर लाठीचार्ज केला होता. खोट्या दाव्यासह ही घटना सध्याची असल्याचे सांगितले जात आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींवरील लाठीचार्जचा जुना व्हिडिओ सध्याचा म्हणून व्हायरल

Written By: Sagar Rawate  

Result: Misleading