नितीन गडकरींनी आपला पक्ष अकार्यक्षम असल्याची टिप्पणी केली का ? वाचा सत्य

Altered राजकीय | Political

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी एका मुलाखतीदरम्यान बोलत असल्याची एक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये गडकरी म्हणतात की, “आज गाव \ खेडे, गरीब, मजूर आणि शेतकरी दु:खी आहेत. गावात चांगले रस्ते नाहीत, पिण्यासाठी शुद्ध पाणी नाही, चांगली रुग्णालये नाहीत, चांगल्या शाळा नाही.” 

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल क्लिप अर्धवट आहे. मूळ व्हिडिओमध्ये माहात्मा गांधीच्या काळातील ग्रामिण भागाची अवस्था सांगत होते.

काय आहे दावा ?

युजर्स हा व्हिडिओ शेअर कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “आज गावे, गरीब, मजूर, शेतकरी दु:खी आहेत. – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी”

हा व्हिडिओ काँग्रेसच्या कोल्हापूर अधिकृत पेजवरूनदेखील शेअर करण्याल आला आहे.

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह 

तथ्य पडताळणी

व्हायरल व्हिडिओमध्ये लल्लनटॉपचे लोगो दिसते. कीव्हर्ड सर्च केल्यावर कळाले की, या मुलाखातीचा हा व्हिडिओ 29 फेब्रुवारी 2024 रोजी लल्लनटॉप युट्यूब चॅनलने अपलोड केला होता.

वरील मुलाखात पाहिल्यावर 18 मिनिट 11 सेकंदावर आपण व्हायरल क्लिपमधील भाग पाहू शकतो.

या ठिकाणी नितीन गडकरी भारत स्वतंत्र झाल्यापासून सुरू झालेल्या दीर्घ कालावधीत ग्रामीण, आदिवासी आणि कृषी अर्थव्यवस्था व स्थितीबद्दल बोलत होते.

गडकरी सांगतात की, “आपल्या देशाच्या विकासामध्ये कृषी क्षेत्राचा जीडीपीमध्ये केवळ 12 टक्के वाटा आहे, उत्पादन क्षेत्राचात 22 ते 24 आणि सेवा क्षेत्राचा 52 ते 54 इतका वाटा आहे. आपली लोकसंख्या 65 टक्के शेतीवर अवलंबून आहे. गांधीजी असताना गावात 90 टक्के लोक राहत होते. परंतु, कालांतराने हळूहळू 30 टक्के लोकांचे स्थलांतर झाले. याचे कारण म्हणजे आज गावातील गरीब मजूर आणि शेतकरी दुःखी आहेत. पाणी, जमीन, जंगल आणि प्राणी, ग्रामीण शेती, आदिवासींची अर्थव्यवस्था, इथे चांगले रस्ते नाहीत. पिण्यासाठी शुद्ध पाणी नाही. चांगली रुग्णालये नाहीत. चांगल्या शाळा नाहीत. शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना चांगला भाव मिळत नाही. या ठिकाणी विकास होणे गरजेचे आहे. या काळात विकास झाला. पण बाकीच्या भागात जेवढा विकास झाला त्या तुलनेत ग्रामिक विकास झाला नाही. आमचे सरकार आल्यानंतर आम्हीही या क्षेत्रासाठी खूप काम करत आहोत.”

नितीन गडकरी यांच्या अधिकृत अकाउंवरून स्पष्ट करण्यात आले की, व्हायरल व्हिडिओ अर्धवट असून चुकीच्या दाव्यासह व्हायरल होत आहे.

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, नितीन गडकरींनी आपला पक्ष (भाजप) अकार्यक्षम असल्याची टिप्पणी केली नाही. मुळात ते माहात्मा गांधीच्या काळातील ग्रामिण भागाची अवस्था सांगत होते. चुकीच्या दाव्यासह अर्धवट व्हायरल होत आहे. 

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:नितीन गडकरींनी आपला पक्ष अकार्यक्षम असल्याची टिप्पणी केली का ? वाचा सत्य

Written By: Sagar Rawate 

Result: Altered