मंदिरात पाणी पिल्याबद्दल दलित मुलाला मारहाण केल्याचा हा फोटो नाही; वाचा सत्य 

False Social

एका मुलाच्या शरीरावर मारहाणीचे वळ उमटल्याचे फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहेत. दावा केला जात आहे की, “हा मुलगा मंदिरात पाणी गेला असता जाती – धर्मावरुन त्याला मारहाण करण्यात आली.”

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल फोटो भारतातील नाही. खोट्या सांप्रदायिक दाव्यासह फोटो व्हायरल होत आहे.

काय आहे दावा ?

व्हायरल फोटोमध्ये मुलाच्या अंगावर अमानुष मारहाणीचे वळ उमटलेले दिसतात.

युजर्स हे फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “मुले ही देवाघरची फुले” हे फक्त ऐकायला छान वाटतं. परंतु जेव्हा एखादं तहानलेले मुल पाणी पिण्याकरिता मंदिरात जातं त्यावेळी त्याला त्याच्या धर्मावरून किंवा जातीवरून प्रताडित करुन काठ्यांचा प्रसाद दिला जातो.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर एका फेसबुक युजरने 12 ऑक्टोबर 2020 रोजी हाच फोटो 

पुढे अधिक सर्च केल्यावर हाच फोटो येमेन नाओ न्यूज या वेबसाईटवर आढळला. 

या फोटोसोबत दिलेल्या बातमीनुसार येमेनच्या अल-महवित प्रदेशात एका 12 वर्षांच्या मुलाला त्याच्या वडिलांनी अमानुष मारहाण केली.  

12 वर्षांच्या मुलाला, शमाख रशीद अल-काहिलीला, त्याच्या वडिलांनी त्याला योग्यरित्या वाढवण्याच्या बहाण्याने बेदम मारहाण केली.

माध्यमांशी बोलताना नागरिकांनी सांगितले की, सुरक्षा अधिकाऱ्यांना वडिलांना अटक करुन तुरुंगवासाचे आदेश दिले. हिच माहिती येथेयेथे वाचू शकता.

मूळ पोस्ट – येमेन नाओ न्यूज | आर्काइव्ह

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, व्हायरल फोटो भारताचा नाही. 2020 मध्ये येमेनमधील एका वडिलांनी आपल्या मुलाला अमानुष पणे मारहाण केली होती. ज्यानंतर पोलिसांनी त्या व्यक्तीला अटक केली होती. खोट्या सांप्रदायीक दाव्यासह हा फोटो शेअर केला जात आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:मंदिरात पाणी पिल्याबद्दल दलित मुलाला मारहाण केल्याचा हा फोटो नाही; वाचा सत्य

Fact Check By: SAGAR RAWATE 

Result: False