
सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, एकाच फोनमध्ये दोन सिम वापरल्यास भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) आता दंड लावणार आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा दावा आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल दावा खोटा असून ग्राहकांची दिशाभूल करणारा आहे.
काय आहे दावा ?
युजर्स हा फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये एका फोन मध्ये दोन सिम वापरायचे नाही, “गजबच न्याय, टैक्स वसूलीचा नवा फंडा.”
मूळ पोस्ट – फेसबुक
झी न्यूजने हा दावा करत पोस्ट शेअर केली आहे.
मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
कीवर्ड सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल होत असेलेला दावा खोटा आहे.
हा दावा सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरल झाल्यावर भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने त्याची दखल घेतली.
ट्रायने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून 14 जून रोजी व्हायरल दाव्याचे खंडन केले की, “अनेक सिम/नंबरिंग रिसोर्सेस ठेवल्यावर ट्राय (TRAI) ग्राहकांवर शुल्क लादण्याचा विचार करत आहे, हा दावा निःसंदिग्धपणे खोटा आहे. असे दावे निराधार असून केवळ जनतेची दिशाभूल करण्यासाठी काम केले जातात.”
मूळ पोस्ट – ट्विटर
निष्कर्ष
यावरून सिद्ध होते की, व्हायरल होत असलेला दावा खोटा आहे. एकाच फोनमध्ये दोन सिम वापरल्यास भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) दंड आकारणार नाही. खोट्या दाव्यासर दावा शेअर केला जात आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)
