गुजरातच्या प्रगतीसाठी भाजपने महाराष्ट्रातील मतदारांना मत देण्याचे आवाहन केले का? वाचा सत्य

Altered राजकीय | Political

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या एका जाहिरातीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या जाहिरातीमध्ये दावा केला जात आहे की, भाजपने आपल्या जाहिरातीत गुजरातच्या प्रगतीसाठी महाराष्ट्रातील मतदारांना महायुतीला मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल जाहिरात एडिटेड आहे.

काय आहे दावा ?

व्हायरल जाहिरातीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी दिसतात. ग्राफिकमध्ये लिहिलेले आहे की, “भाजप-महायुती आहे तर गती आहे, गुजरातची प्रगती आहे.”

युजर्स ही जाहिरात शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “गुजरातच्या प्रगतीसाठी  भाजप महायुतीला मतदान करा.”

मूळ पोस्ट – ट्विटर | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

व्हायरल पोस्टमधील मजकूर कीव्हर्ड द्वारे सर्च केल्यावर अशी कोणतीही जाहिरात भाजपच्या सोशल मीडियावर आढळत नाही.

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी 6 नोव्हेंबर रोजी व्हायरल फोटोशी मिळतेजुळते पोस्टर शेअर केले होते.

या पोस्टमध्ये गुजरातच्या जागी महाराष्ट्रचा उल्लेख आढळतो.

मूळ पोस्ट – इंस्टाग्राम

नितेश राणे यांनी शेअर केलेल्या पोस्टमधील मजकूर कीव्हर्ड द्वारे सर्च केल्यावर भाजप महाराष्ट्राच्या अधिकृत पेजवर अनेक पोस्ट आणि जाहिराती आढळल्या.

मूळ पोस्ट – भाजप महाराष्ट्र

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, व्हायरल फोटो बनावट आहे. मूळ जाहिरातमध्ये “भाजप – महायुती आहे, तर गती आहे. महाराष्ट्राची प्रगती आहे,” असा नारा दिला होता. खोट्या दाव्यासह हा बनावट फोटो व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:गुजरातच्या प्रगतीसाठी भाजपने महाराष्ट्रातील मतदारांना मत देण्याचे आवाहन केले का? वाचा सत्य

Written By: Sagar Rawate  

Result: Altered