इंडिगो संकटाच्या काळात केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री नाचतानाचा जुना व्हिडिओ भ्रामक दाव्यासह व्हायरल

दिशाभूल करणाऱ्या I Misleading राजकीय | Political

इंडिगोची शेकडो विमाने दररोज रद्द होत असल्याने प्रवाशांमध्ये नाराज असून कंपनीवर टीका करत आहेत. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू स्टेजवर डान्स करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दावा केला जात आहे की, इंडिगोमध्ये संकट सुरू असताना केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू एका कार्यक्रमात स्टेजवर डान्स करता आहेत.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ चार महिन्यांपूर्वीचा असून सध्या सुरू  असलेल्या इंडिगो संकटादरम्यानचा नाही.

काय आहे दावा ?

व्हायरल व्हिडिओमधील पहिल्या क्लिपमध्ये प्रवारी आणि त्यांच्या बॅगांचा ढीग तर दुसऱ्या क्लिपमध्ये नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू स्टेजवर डान्स करताना दिसतात.

युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “बघा 4 दिवसांत जवळपास 3 हजार फ्लाईट्स रद्द, एअर पोर्ट ठप्प, विमान कंपनी  यात्रे करूंचे सामान परत द्यायला तैयार नाही, खायला अन्न नाही, पाणी नाही, लहान, मोठे , म्हातारी मंडळी सगळ्यांची हवाई ‘ suffer ‘ सुरू असतांना नागरिक उड्डयन मंत्री आपला डान्स परफार्मन्स ची ‘ Delivery ‘ देतांना दिसतो आहे.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

कीवर्ड सर्चमध्ये कळाले की, व्हायरल व्हिडिओ प्रत्यक्षात चार महिन्यांपूर्वीचा आहे.

ईटीव्ही आंध्र प्रदेश यांनी हा व्हिडिओ 29 जुलै 2025 रोजी युट्यूबवर शेअर केल्याचे आढळले. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहितात की, “लग्नाच्या रिसेप्शनमध्ये राम मोहन नायडू यांचा डान्स.”

ईटीव्हीच्या रिपोर्टनुसार “राम मोहन नायडू विजयनगरम जिल्ह्यातील भोगापुरम येथील एका रिसॉर्टमध्ये आपल्या काकांच्या मुलाच्या लग्नाला उपस्थित होते आणि संगीत कार्यक्रमात आपल्या भावांसोबत ग्रुप डान्स करत होते.”

याशिवाय एबीएन तेलुगु, एचएमटीवी, न्यूज18 तेलुगु आणि ईटीव्ही आंध्र प्रदेश यांसारख्या अनेक स्थानिक आणि राज्यस्तरीय न्यूज चॅनेल्सनीही जुलै 2025 मध्ये हा व्हिडिओ प्रसारित केला होता.

पीआयबीचे स्पष्टीकरण

पीआयबीने 8 डिसेंबर रोजी आपल्या एक्स हँडलवर पोस्ट करून स्पष्ट केले की हा व्हिडिओ चार महिन्यांपूर्वीचा आहे आणि त्याचा सध्याच्या इंडिगो संकटाशी काहीही संबंध नाही.

उड्डाण गोंधळावर नायडूंचे विधान

नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू लोकसभेत म्हणाले की, “इंडिगो कंपनीची 5 डिसेंबर रोजी उड्डाणसंख्या 706 वर होती, पण पुढच्या दिवशी ही संख्या 1800 पर्यंत गेली होती. सध्या परिस्थिती सुधारत आहे. गोंधळाची जबाबदारी इंडिगो कंपनीच असून त्यांच्यावर नियमभंगाची कारवाई केली जाईल. तसेच कंपनीने प्रवाशांसाठी रिफंड, बॅगेज आणि सेवांसंबंधी तातडीचे आदेश देण्यात आले आहे.” अधिक महिती येथे वाचू शकता.

निष्कर्ष

यावरून हे सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ चार महिन्यांपूर्वीचा असून इंडिगो संकटाशी संबंधित नाही. दिशाभूल करणाऱ्या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Avatar

Title:इंडिगो संकटाच्या काळात केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री नाचतानाचा जुना व्हिडिओ भ्रामक दाव्यासह व्हायरल

Fact Check By: Sagar Rawate  

Result: Misleading


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *