इस्रायलमधील हायफा शहरावर इराणचा मोठा हल्ला म्हणून एआय व्हिडिओ व्हायरल

False Social

इराण-इस्रायल यांच्यातील संघर्षाने सर्व जगाचे लक्ष वेधले आहे. याच पार्श्वभूमी एका स्फोटोचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, “इराणने इस्रायलमधील हायफा शहरावर मोठा हल्ला केला.”

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ एआय द्वारे तयार करण्यात आला आहे.

काय आहे दावा ?

व्हायरल व्हिडिओमध्ये एका इमारतीच्या बाल्कनीमधून शहरा जवळ झालेला भीषण स्फोट दिसतो.

युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “हायफा शहरावर इराण चा मोठा हल्ला.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर व्हायरल व्हिडिओ खरा नसल्याचे आढळले.

Cemil Acıyan Gallery नामक चॅनलने हाच व्हिडिओ 20 जून रोजी युट्यूबवर शेअर केल्याचे आढळले.

कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “लेसर शस्त्राने अणुस्फोट | एआय व्हिडिओ.”

व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये एका युजरने हा व्हिडिओ कुठला असल्याचे प्रश्न विचारले तेव्हा चॅनलने उत्तर दिले की, “हा एआय व्हिडिओ.” 

मूळ पोस्ट – युट्यूब

अधिक तपास केल्यावर कळाले की, “या युट्यूब चॅनलने व्हायरल व्हिडिओ प्रमाणे अनेक एआय द्वारे तयार केलेले स्फोटाचे क्लिप्स अपलोड केलेल्याचे आढळले.”

या युट्यूब चॅनलच्या डिस्क्रिशनमध्ये लिहिले होते की, “या चॅनेलवरील सर्व व्हिडिओ आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्राद्वारे वापर करून तयार केले आहेत.” 

मूळ पोस्ट – युट्यूब

हाय व्हिडिओ Cemil Acıyan Gallery चॅनलने आपल्या इंस्टग्राम चॅनलवर 22 जून रोजी शेअर केला होता.

मूळ पोस्ट – इंस्टाग्राम

इराणचा हायफावरील हल्ला

इराणने 22 जून रोजी इस्रायलच्या उत्तरेकडील हायफा शहरावर क्षेपणास्त्रे डागली होते. हे हल्ले अमेरिकेने इराणच्या अणुस्थळांवर केलेल्या हवाई हल्ल्यांच्या प्रत्युत्तरात होते. 

या हल्ल्यात हायफामधील 3 लोक आणि आजूबाजूच्या भागांमधील एकूण 20 ते 21 जण जखमी झाले.तसेच शहरातील रडार प्रणाली काही वेळासाठी ठप्प झाली होती.

या हल्ल्यामुळे हायफा येथील रिफायनरीसह काही सुविधा नुकसानीमुळे काही काळ बंद ठेवाव्या लागल्या. इराणने “True Promise III” या नावाने मोठ्या प्रमाणात क्षेपणास्त्र हल्ल्यांची मालिका सुरू केली होती, ज्याचे कारण इस्रायल आणि अमेरिकेच्या अणुस्थळांवरील हल्ले होते. अधिक महिती येथे, येथेयेथे वाचू शकता.

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ एआय तंत्राद्वारे तयार केला गेला असून इस्रायल-इराण युद्धाशी संबंधित नाही. खोट्या दाव्यासह हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:इस्रायलमधील हायफा शहरावर इराणचा मोठा हल्ला म्हणून एआय व्हिडिओ व्हायरल

Fact Check By: SAGAR RAWATE 

Result: False


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *