प्रसिद्ध चित्रकार प्रभाकर बरवे यांच्या चित्रप्रदर्शनातील घटनेनंतर अमोल पालेकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेवर अभिनेते योगेश सोमण यांनी टीका केली आहे. बारशाच्या कार्यक्रमाला आमंत्रित केल्यावर पालेकर मर्तिकाचे श्लोक म्हणतात. मग औचित्यभंग होणारच असे सोमण यांनी म्हटले आहे. यासोबतच सोमण यांनी पालेकरांवर व्यापक कट रचल्याचा आरोपदेखील केला आहे. महाएमटीबी डॉट कॉमने याबाबतचे वृत्त दिले आहे.

हे वृत्त सविस्तर वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

महाएमटीबी डॉट कॉम आक्राईव्ह लिंक

महा एमटीबीच्या पेजवर या पोस्टला एक हजार 200 लाईक्स आहेत. या बातमीवर 31 जणांनी प्रतिक्रिया दिली आहे. हे वृत्त 81 जणांनी शेअर केले आहे.

आक्राईव्ह लिंक

तथ्य पडताळणी

अभिनेते योगेश सोमण यांनी आपल्या पर्सनल फेसबुक पेजवरुन पालेकरांवर टीका केली आहे. या व्हिडिओत त्यांनी उदाहरणादाखल बारशाच्या कार्यक्रमासाठी पालेकरांना निमंत्रित केलं आणि तिथं त्यांनी मर्तिकाचे श्लोक म्हटले असे म्हटलं आहे.

आक्राईव्ह लिंक

जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीनेही अभिनेते योगेश सोमण यांचा व्हिडिओ प्रसारित केला आहे. सोमण यांनी पालेकर यांच्यावर विषय सोडून बोलल्याची टीका केली आहे.

हा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

https://www.youtube.com/watch?v=PvbZrAjpCoo

निष्कर्ष

अभिनेते योगेश सोमण यांनी आपल्या पर्सनल फेसबुक पेजवरुन पालेकरांवर टीका केली आहे. या व्हिडिओत त्यांनी उदाहरणादाखल बारशाच्या कार्यक्रमासाठी पालेकरांना निमंत्रित केलं आणि तिथं त्यांनी मर्तिकाचे श्लोक म्हटले असे म्हटलं आहे. प्रत्यक्षात पालेकरांनी बारशाच्या कार्यक्रमात कुठेही मर्तिकाचे श्लोक म्हटलेले नाहीत. फॅक्ट क्रिसेन्डोच्या पडताळणीत या वृत्ताचे शीर्षक चुकीचे असल्याचे दिसून आले आहे.

Avatar

Title:बारशाच्या कार्यक्रमात पालेकरांनी म्हटले मर्तिकाचे श्लोक; सत्य की असत्य

Fact Check By: Dattatray Gholap

Result: False headline (चुकीचे हेडलाईन)