प्राचीन काळापासून चंद्रांला सौंदर्य आणि प्रेम यांचे प्रतीक मानले जाते. विलियम शेक्सपियर सारख्या अनेक महान साहित्यिकांनी त्यांच्या साहित्यात रोमँटिक/शृंगारिक चांदण्या रात्री बद्दल लिहिले आहे. चंद्र आपल्या अनेक बॉलीवूड गाण्यांसाठी प्रेरणास्थान राहिलेले आहे जे आजही क्लासिक/अभिजात मानल्या जातात. रोमान्स साठीच्या रेसिपीमध्ये चांदणी रात्र हे एक अत्यंत महत्वपूर्ण घटक आहे म्हणून आपण चंद्रावरचे बॉलीवूड चे प्रेम स्पष्टपणे समजू शकतो. 'किंग ऑफ बॉलीवूड' आणि ' किंग ऑफ रोमान्स' सारखी उपाधि कमावलेल्या व्यक्ती पेक्षा बॉलीवूड ला कोण चांगले सादर करू शकते? हो, तो स्वतः किंग खान, शाहरुख खान आहे. ज्याने जगभरात लाखो चाहत्यांचे हृदय जिंकलेले आहे.

चंद्रावरील जमिनीच्या विक्रीविषयी एक मनोरंजक लेख, वेगवेगळ्या किस्स्यांसकट प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक दोन्ही मीडिया वर आणि सोशल मीडियावर पसरत आहे. खरंच! ज्यांनी त्यांच्या जोडीदाराला पृथ्वीवर चंद्र आणून देण्याचे वचन दिलेले आहे त्यांच्यासाठी चंद्राचा भाग खरेदी करणे ही खूप रोमँटिक कल्पना आहे

पण हे खरोखर शक्य आहे का?

जेव्हा आपण या विषयावर विचार करतो तेव्हा आपल्या मनात काही मूलभूत प्रश्न उभे राहतात: चंद्राचा मालक कोण आहे? आपण खरोखरच चंद्रावर जमीन खरेदी करू शकतो का? आणि किती लोकांनी चंद्रावर जमीन विकत घेतली आहे? या तपासणीत, आम्ही उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करू आणि शाहरुख खान ने खरोखरच चंद्राचा एक भाग खरेदी केला असेल का हे तथ्य तपासू.

कथा:

अलीकडेच पुण्यातील एका महिलेची कथा मिडिया मध्ये पसरत होती, जिची काही लोकांनी तिला चंद्रावर मालमत्ता दिली जाईल असे सांगून 50000 रुपये घेऊन फसवणूक केली. काही मराठी वृत्तपत्रांनी हे वृत्त प्रकाशित केले होते आणि दावा केला की जेव्हा त्यांनी अधिक चौकशी केली तेव्हा त्यांना असे आढळले की शाहरुख खान आणि सुशांत सिंह राजपूत यासारखे बॉलीवूड अभिनेतेदेखील चंद्रावरील जमिनीचे मालक आहेत. मराठी दैनिक सकाळ द्वारे रिपोर्ट करण्यात आलेली गोष्ट खालील लिंक ला भेट देऊन वाचल्या जाऊ शकते:

पुण्यातील महिलेने चंद्रावर जमीन खरेदी केली

यासारखीच गोष्ट लोकमत सारख्या दुसऱ्या दैनिकाने प्रकाशित केली होती, ज्यांनी दावा केला आहे कि, त्यांनी अमेरिकेतील लुना सोसायटी इंटरनॅशनलच्या संचालकांसोबत संपर्क साधला, ज्यांनी एका इमेल मध्ये असा दावा केला आहे कि, शाहरुख खान आणि सुशांत सिंह राजपूत यांच्यासारख्या बॉलीवूड सेलिब्रिटीज ची चंद्रावर स्वतःच्या मालकीची जमीन आहे. आमच्या वाचकांच्या संदर्भासाठी गोष्टीची लिंक खाली दिलेली आहे:

शाहरुख खान आणि इतरांनी चंद्रावर जमीन खरेदी केली

आमची तपासणी:

आमच्या मनातील पहिला प्रश्न म्हणजे चंद्राचा मालक कोण आहे? कारण फक्त मालकालाच त्याची मालमत्ता विकण्याचा अधिकार आहे आणि दुसरा प्रश्न म्हणजे चंद्रावर जमीन खरेदी करणे शक्य आहे का?

याचे उत्तर युएन (संयुक्त राष्ट्रच्या) करारामध्ये सापडू शकते जो कि चंद्र आणि इतर तारे यांचा समावेश करून अंतराळाचेसंशोधन आणि वापर यासारख्या देशांच्या उपक्रमांवरनियंत्रण ठेवणारा करार किंवा सोप्या भाषेत फक्त आउटर स्पेस करार. जगातील जवळपास सर्व देशांनी हा करार मंजूर केला आहे, ज्यामध्ये सर्व स्पेसफेअरिंग (अंतरिक्षात यात्रा करणाऱ्या) देशांचा समावेश आहे, हा करार कोणत्याही देशाला किंवा सरकारला ग्रह तारे आणि अंतराळावर सार्वभौमत्वचा दावा ठोकन्यास स्पष्टपणे मनाई करतो. कराराच्या अनुच्छेद 2 मध्ये असे म्हटले आहे की "चंद्र आणि इतर ग्रह तारे यांचा समावेश करून अंतराळ, हे सार्वभौमत्वाच्या दाव्याद्वारे, वापराच्या किंवा व्यवसायाद्वारे किंवा कोणत्याही अन्य माध्यमाने राष्ट्रीय विनियोगाच्या/ अधीन नाही."

त्यामुळे, कोणतेही सरकार चंद्र, अंतराळ किंवा कोणत्याही ग्रह ताऱ्यांवर मालकी हक्क सांगू शकत नाही. परंतु लुनार अॅम्बसी च्या वेबसाईट वर दावा केला आहे कि, करारामध्ये एक कायदेशीर पळवाट आहे, ज्यानुसार ते सरकारला चंद्रावर दावा करण्यासाठी मनाई करतात परंतु व्यक्ती किंवा कॉर्पोरेशन्स ला नाही. त्यांनी पुढे असा तर्क केला आहे की चंद्रावर खनिज तेलासारखी संसाधने आढळल्यास त्या संसाधनांचे वापर मर्यादित केल्यामुळे मानवी समाजाला नुकसान होऊ शकते. त्यांच्या वेबसाईट वरील कायदेशीर आणि एफएक्यू (Legal and FAQ) सेक्शन मध्ये याबद्दलचे तर्क वाचता येऊ शकतात. आमचे वाचक खालील लिंकला भेट देऊन ते वाचू शकतात:

https://lunarembassy.com/current-space-law/

राजीव वी. बागडी नावाच्या हैदराबाद येथील उद्योजकाने सुद्धा 2003 मध्ये चंद्रावर जमीन विकत घेतली आहे. त्याने दावा केला आहे कि, त्याने चंद्रावर 5 एकर जमीन $140 डॉलर मध्ये खरेदी केली आहे आणि त्या संदर्भात लुनार रिपब्लिक ने त्याला एक लेखी करार जारी केला आहे. पण त्याने हे देखील सांगितले आहे की तो लेखी कराराच्या वैधतेविषयी अनिश्चित आहे परंतु त्याला जोखीम घेण्याची सवय आहे आणि त्याने हा सौदा केला आहे कारण, जर हे खरे असेल तर तो त्यामधून चांगले नशीब घडवू शकतो. त्याने खालीलप्रमाणे वक्तव्य केले आहे: "मला माहिती नाही कि हे डॉक्युमेंट कायदेशीर आहे किंवा नाही, परंतु जोखीम घेण्याची मला सवय आहे...जर या धाडसाने माझे नशीब उघडले तर, मी आनंदी होईल". हि गोष्ट या टीओआय लेखामध्ये वाचता येईल:

तथापि, भारतासह अनेक देश आउटर स्पेस कराराचे पालन करतात आणि त्यांना पृथ्वीबाहेरच्या कोणत्याही रिअल इस्टेटची विक्री किंवा खरेदी मान्य नाही.

तसेच, पृथ्वीबाहेरच्या रिअल इस्टेट च्या व्यवसायामध्ये असलेल्या कंपनीच्या आणि व्यक्तीच्या विश्वासार्हतेचा प्रश्न येथे आहे. पुण्यातील एका महिलेने तिला जमीन विकणाऱ्या एजन्सी ने प्रतिसाद दिला नाही म्हणून 2007 मध्ये फसवणुकीबद्दल तक्रार दाखल केली होती .

आपल्या मुख्य प्रश्नावर परत येऊ, शाहरुख खान ने चंद्रावर मालमत्ता खरेदी केली आहे का? हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तपत्रातील न्यूज मध्ये म्हटले आहे की, शाहरुख खानने याबद्दल दुजोरा दिला आहे कि, त्याची चंद्रावर स्वतःच्या मालकीची जमीन आहे परंतु त्याने ती कधीच खरेदी केली नाही. शाहरुख खानची खूप मोठी चाहती असलेली ऑस्ट्रेलियन महिला दरवर्षी जमीन खरेदी करते आणि शाहरूखला त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यासंदर्भातील कागदपत्रे आणि सीडी पाठवते.

यासारखीच गोष्ट, टीओआय च्या लेखामध्ये प्रकाशित झाली होती, ज्यामध्ये शाहरूख खानसाठी त्याच्या चाहत्यांनी केलेल्या विचित्र गोष्टींची उदाहरणे दिली होती.

तथ्य क्रमांक 4 मध्ये एका महिलेविषयी उल्लेख केलेला आहे जी दरवर्षी शाहरुख खानसाठी चंद्रावर जमीन खरेदी करते

अनेक माध्यमांनी आपल्या रिपोर्ट मध्ये दावा केला आहे की, सुशांत सिंह राजपूत यांनी खरोखरच चंद्रावर जमीन विकत घेतली आहे आणि सुशांतने मीड 14 "एलएक्स 600 नावाचा एक अॅडवांस टेलिस्कोप सुद्धा खरेदी केला आहे ज्यामुळे तो त्याच्या चंद्रावरील नवीन जमिनीवर लक्ष ठेवू शकेल. आमच्या वाचकांच्या संदर्भासाठी विविध रिपोर्ट साठीची लिंक खाली दिलेली आहे:

Indian Express l DNAIndia l latestly.com

इंडियन एक्सप्रेस l डीएनएइंडिया l लेटेस्टलि.कॉम

निष्कर्षः

बऱ्याच माध्यमांच्या रिपोर्टनुसार, शाहरुख खानला त्याच्या चाहत्यांनी चंद्रावरील काही जमीन भेट दिली आहे आणि त्यामुळे त्याची चंद्रावर जमीन आहे परंतु त्याच वेळी आउटर स्पेसच्या करारानुसार चंद्र कुणाच्याही मालकीचा नाही आणि यामुळे तो विकला जाऊ शकत नाही. पुथ्वीबाहेरच्या रिअल इस्टेट चा व्यवसाय भारतासह कोणत्याही देशाद्वारे केला जाणे मान्यताप्राप्त नाही.

वरील दिलेल्या आउटर स्पेस रियल एस्टेट कंपनी द्वारे जारी केलेले मालकीचे प्रमाणपत्र फ़क्त महागडा कागद आहे आणि कोणत्याही व्यक्तीला चंद्रावर दावा करता येणार नहीं.

आम्हाला ही गोष्ट सत्य असल्याचे आढळते परंतु येथे एक ट्वीस्ट आहे की दावा केल्याप्रमाणे जमिनीवर कोणताही प्रत्यक्ष ताबा नाही.

टिप: वरील चित्रे गूगल वरून घेतलेली आहेत.टॅग्ज: शाहरूख खान, एसआरके, किंग ऑफ बॉलीवूड, किंग खान, सुशांत सिंह राजपूत, बॉलीवूड, चंद्र, लुना सोसायटी इंटरनॅशनल, लुनार अॅम्बसी, द आउटर स्पेस ट्रीटी (करार)