उत्तर प्रदेशचा व्हिडिओ नाशिकच्या शाहजानी ईदगाहची गर्दी म्हणनू व्हायरल; वाचा सत्य

Social दिशाभूल करणाऱ्या I Misleading

नुकतीच मोठ्या उत्साहात ईद साजरी करण्यात आली. यानंतर सोशल मीडियावर मुस्लिम बांधवांच्या गर्दीच्या व्हिडिओ व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, गर्दीचा हा व्हिडिओ नाशिकच्या शाहजानी ईदगाहचा आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओ नाशिकचा नाही. ही गर्दी उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद येथील आहे. चुकीच्या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे.

काय आहे दावा ?

या 27 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये नमाज पठण करून मुस्लिम बांधव ईदगाहमधून (प्रार्थनास्थळ) बाहेर पडताना दिसतात.

हा व्हिडिओ शेअर करताना युजर्स लिहितात की, “शाहजानी ईदगाह नाशिक येथील दृश्य.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह 

तथ्य पडताळणी

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, हा व्हिडिओ नाशिकच्या शाहजानी ईदगाहचा नाही.

दैनिक भास्करच्या बातमीनुसार 23 एप्रिल 2023 रोजी ईदुल फित्रचानिमित्त उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद येथे हजारो मुस्लिम बांधवानी नमाज अदा केली होती. नमाज दरम्यान पोलिसांनी ड्रोन कॉमेराच्या मदतीने आसपासच्या ठिकाणावर नजर ठेवली होती.

खालील व्हिडिओ पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल की, व्हायरल व्हिडिओ मुरादाबादच्या ईदगाहचा आहे.

आर्काइव्ह

सदरील माहितीच्या आधारे मॅप्सवर शोध घेतल्यावर व्हिडिओमधील जागा सापडली. ती आपण येथे पाहू शकतात.

खाली दिलेली तुलना पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल की, व्हायरल व्हिडिओ आणि मॅपमधील दाखवलेली जागा एकच आहे.

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, हा व्हिडिओ नाशिकच्या शाहजानी ईदगाहचा नाही. ही गर्दी उत्तर प्रदेशच्या मुरादाबाच्या ईदगाहची आहे. चुकीच्या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर त्यांची सत्यता जाणून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. आमचे लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम  ट्विटर वर फॉलो करा.)

Avatar

Title:उत्तर प्रदेशचा व्हिडिओ नाशिकच्या शाहजानी ईदगाहची गर्दी म्हणनू व्हायरल; वाचा सत्य

Fact Check By: Sagar Rawate  

Result: Misleading