महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला स्वतंत्र 10 टक्के आरक्षण देण्याचे निर्णय घेतला असून परंतु, ते आरक्षण ओबीसीतून द्यावे अशी मनोज जरांगे पाटील यांची मागणी केली आहे.

सध्या मराठा आरक्षणाच्या पर्श्वभूमीवर जन आक्रोशाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओ काही लोक चार वाहनांची वाहणाची तोडफोड करताना दिसतात.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ सध्याचा नसून 6 वर्षांपूर्वीचा आहे. मनोज जरांगे यांच्या समर्थकांनी ही तोडफोड केली नाही.

दावा केला जात आहे की, मराठा आरक्षण आंदोलकांनी व्हिडिओ सध्याचा असून मनोज जरांगे पाटीलशी संबंधित आहे.

काय आहे दावा ?

व्हायरल व्हिडिओमध्ये बातमी दिसते की, सरकारी नौकरी आणि शिक्षणामध्ये आरक्षण मिळण्यासाठी मराठा आंदोलकांनी औरंगाबादमध्ये (छत्रपती संभाजीनगर) एका सरकारी वाहणाची तोडफोड केली.

मूळ पोस्ट – इंस्टाग्राम | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओ सध्याचा नसून 6 वर्षांपूर्वीचा आहे.

नवभारत टाइम्सने 24 जुलै 2018 रोजी आपल्या युट्यूब अकाउंवर हाच व्हिडिओ शेअर केला होता. कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “औरंगाबादमध्ये मराठा आरक्षण आंदोलनात प्रचंड हिंसाचार.”

तसेच व्हिडिओसोबत माहिती दिली होती की, “मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर होत असलेल्या दिरंगाईच्या निषेधार्थ आणि आंदोलनादरम्यान एका व्यक्तीने नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला हिंसक वळण लागले. औरंगाबादमध्ये आंदोलकांनी हिंसक वळण घेत वाहणाची तोडफोड करण्यात आली.”

https://youtu.be/C4j_LSjsQBc?si=klUv58QciLt76iqS

एबीपी माझाच्या बातमीनुसार मराठा आरक्षणाच्या मागणीसाठीच्या आंदोलनादरम्यान औरंगाबादमध्ये आंदोलक तरुणाचा गोदावरी नदीत पडून मृत्यू झाला. या घटनेच्या निषेधासाठी 24 जुलै 2018 रोजी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली होती.

मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव काकासाहेब शिंदे असून त्याला शहीद घोषित करुन त्यांच्या कुटुंबीयांना 50 लाख रुपयांची भरपाई देण्यात यावी. तसेच आरक्षणाबाबत हायकोर्टाचा निर्णय येईपर्यंत मेगाभरती रोखावी, स्थानिक अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशा वेगवेगळ्या मागण्या मराठा क्रांती मोर्चाच्या आयोजकांनी केल्या होत्या.

या बंददरम्यान औरंगाबादमध्ये (छत्रपती संभांजीनगर) मराठा आंदोलनाला हिंसक वळण मिळाले आणि संतप्त जमावाने अग्नीशमन दलाची गाडी फोडून ती जाळण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाचीही झाली होती.

या ठिकाणी कुठे ही मनोज जरांगे पाटील यांचा उल्लेख आढळत नाही.

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ सध्याचा नसून 6 वर्षांपूर्वीचा आहे. 2018 मध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आणि मृत आंदोलकाच्या विरोधात हा महाराष्ट्र बंदची हाक देत हा आक्रोश मार्चा काढल्या गेला होती. मनोज जरांगेंच्या समर्थकांनी ही तोडफोड केली नाही. चुकीच्या दाव्यासह जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Avatar

Title:मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे समर्थकांनी अग्निशामक दलाची गाडी फोडली का?

Fact Check By: Sagar Rawate

Result: Misleading