भाजपच्या प्रचार वाहनावरील हल्ल्याचा हा व्हिडिओ कर्नाटकचा आहे का ? वाचा सत्य

दिशाभूल करणाऱ्या I Misleading राजकीय | Political

कर्नाटक विधानसभा निवडणूक अवघ्या दोन आठवड्यांवरून आलेली असताना प्रचाराला उधान आलेले आहे. या पार्श्वभूमीवर प्रचार वाहनावर होत असलेल्या हल्ल्याचा व्हिडिओ शेअर करून दावा केला जात आहे की, कर्नाटकमधील नाराज मतदारांनी हा भाजपच्या प्रचार वाहनावर हल्ला केला. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओ कर्नाटकचा नसून तेलंगणामधील आहे.

काय आहे दावा ?

या 30 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये काही लोक भाजपच्या प्रचार वाहनाची तोडफोड करीत आहेत. तसेच पोलिस दगडफेक करणाऱ्यांना थांबविण्याचा प्रयत्न करत आहेत.

युजर्स व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “महाशक्तीची कर्नाटकमध्ये बिकट अवस्था भारतात बदलाची नांदी.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओ कर्नाटकचा नाही.

बीएनएन फेसबुक पेजवर हा व्हिडिओ 1 नोव्हेंबर 2022 रोजी अपलोड करण्यात आला होता. व्हिडिओसोबत दिलेल्या महितीनुसार ही घटना तेलंगणातील मुनुगोडे या गावात घडली होती. ही पोस्ट आपण खाली पाहू शकतात.

https://www.facebook.com/watch/?v=807848140452508

वरील माहितीच्या आधारे अधिक शोध घेतल्यावर कळाले की, तेलंगणातील नलगोंडा जिल्ह्यातील मुनुगोडे विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी सत्ताधारी तेलंगणा राष्ट्र समिती (सध्याची भारतीय राष्ट्र समिती) आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली होती.

मुनुगोडे भागाच्या पालीवेला या गावात, भाजपचे आमदार एटेला राजेंदर यांच्या रॅलीमध्ये प्रचार वाहनावर दगड फेक आणि लाठीने हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात आमदारचे अंगरक्षक जखमी झाला.

प्रत्युत्तर म्हणून भाजप कार्यकर्त्यांनीदेखील टीआरएस कार्याध्यक्ष आणि राज्यमंत्री केटी रामाराव यांच्या रॅलीवर दगडफेक केली. सदरील संपूर्ण बातमी आपण खालील व्हिडिओमध्ये पाहू शकतात.

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ कर्नाटकचा नसून गेल्या वर्षी ही घटना तेलंगणातील मुनुगोडे या गावात घडली होती. चुकीच्या दाव्यासह जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर त्यांची सत्यता जाणून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. आमचे लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर वर फॉलो करा.)

Avatar

Title:भाजपच्या प्रचार वाहनावरील हल्ल्याचा हा व्हिडिओ कर्नाटकचा आहे का ? वाचा सत्य

Fact Check By: Sagar Rawate 

Result: Misleading