पीएम नेतान्याहू पळत असल्याचा जुना व्हिडिओ इस्रायल-इराण संघर्षाशी जोडून व्हायरल

दिशाभूल करणाऱ्या I Misleading राजकीय | Political

इस्रायल, इराण आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक मध्यमवयीन व्यक्ती पळताना दिसते.

दावा केला जात आहे की, “हा अलीकडील व्हिडिओ असून इराणच्या हल्ल्यांपासून वाचण्यासाठी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू पळत आहेत.”

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओचा इस्रायल-इराण संघर्षाशी काहीही संबंध नाही.

काय आहे दावा ?

व्हायरल व्हिडिओमध्ये सूट-बूट घातलेला एक मध्यमवयीन व्यक्ती पळताना दिसतो.

युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना दिसतात की, “तुम्हाला माहित आहे का की हा फरारी इराणच्या भीतीने जर्मनीमध्ये एका खड्ड्यात लपून बसला आहे. केवळ इराणनेच जगाला मुस्लिमांची ताकद दाखवून दिली आहे. आता हा फरारी आपला देश सोडून भीतीने एका खड्ड्यात लपून बसला आहे.”

मूळ पोस्ट – ट्विटर | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओ 2021 पासून सोशल मीडियावर उपलब्ध आहे. 

बेंजामिन नेतान्याहू यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर हाच व्हिडिओ 14 डिसेंबर 2021 रोजी शेअर केलेला आढळला.

कॅप्शनमध्ये हिब्रू भाषेत दिलेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ क्नेसेटमध्ये (इस्रायली संसद) शूट करण्यात आला आहे.

तसेच नेतान्याहू यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरही हाच व्हिडिओ 14 डिसेंबर 2021 रोजी शेअर करण्यात आलेला आढळला. 

कॅप्शनमध्ये त्यांनी “मला तुमच्यासाठी धावायला नेहमी अभिमान वाटतो” असे म्हटले आहे.

https://www.instagram.com/reels/CXb_rp0jX5S

तसेच, इस्रायलमधील ‘इनएनएन’ या न्यूज वेबसाइटवरील रिपोर्टनुसार, त्या दिवशी नेतान्याहू संसदेत मतदानासाठी उशीर झाल्यामुळे धावत होते.

मूळ पोस्ट – इनएनएन

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ सुमारे पाच वर्षांपूर्वीचा असून 2021 मध्ये नेतान्याहू संसदेत मतदानासाठी उशीर झाल्यामुळे धावत होते. या व्हिडिओचा सध्याच्या इराण-इस्रायल संघर्षाशी काहीही संबंध नाही. भ्रामक दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्याव्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोलाफेसबुक,इन्स्टाग्रामट्विटरयेथे फॉलो करा.)

Result Stamp

Title: पीएम नेतान्याहू पळत असल्याचा जुना व्हिडिओ इस्रायल-इराण संघर्षाशी जोडून व्हायरल

Fact Check By: Sagar Rawate

Result: Misleading


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *