पंजाबमधील महिलांच्या कुस्तीचा जुना व्हिडिओ ‘भारत-पाक सामना’ म्हणून व्हायरल
राष्ट्रीय सेवा संघात प्रशिक्षण घेतलेल्या एका समान्य महिलेने दुबईमधील सामन्यात एका पाकिस्तानी कुस्तीपटूला हरविले, या दाव्यासह एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ 8 वर्षांपूर्वीचा असून दोन्ही महिला भारतीय कुस्तीपटू आहेत.
काय आहे दावा ?
व्हायरल व्हिडिओमध्ये एक महिला प्रेक्षकांना लढण्याचे आव्हान देते. प्रेक्षकांच्या गर्दीतून एक महिला आव्हान स्वीकारते आणि जिंकतेसुद्धा. या दोन्ही महिलांना सावरण्यासाठी पुरूष पहिलवान स्टेजवर येतात.
युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, "दुबई येथे झालेला कुस्ती संघाचा सामना एका पाकिस्तानी कुस्तीपटूने भारतीय महिलांची खिल्ली उडवली आणि स्पर्धा करण्याचे आव्हान दिले. Rssच्या महिला विंग मध्ये प्रशिक्षण घेतलेली चामुंडा रूपा थाली या महिलेने भगवे कपडे घालून स्पर्धेला सामोरी गेली आणि दोन वेळा पाकिस्तानी महिला कुस्तीपटूला पराभूत केले."
मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओ 8 वर्षांपासून सोशल मीडियावर उपलब्ध आहे.
सीडब्यूई इंडिया नामक युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ 13 जून 2016 रोजी अपलोड केला होता. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “कविताने बीबी बुल बुलचे खुले आव्हान स्वीकारले.”
हा धागा पकडून अधिक सर्च केल्यावर कळाले की, व्हिडिओमधील सामना ‘कॉन्टिनेन्टल रेसलिंग एंटरटेनमेंट’ (सीडब्यूई) या भारतीय व्यावसायिक कुस्ती प्रशिक्षण अकादमीने पंजाबमधील जलंधर शहरात आयोजित केला होता.
भारतातील पहिली व्यावसायिक महिला कुस्तीगीर बीबी बुल बुल आणि हरियाणाच्या पॉवर-लिफ्टिंग आणि एमएमए चॅम्पियन कविता यांच्यात हा सामना झाला होता.
परंतु, या ठिकाणी कुठे ही महिला पाकिस्तानी किंवा राष्ट्रीय सेवा संघातील प्रशिक्षत असल्याचा उल्लेख आढळत नाही.
मूळ पोस्ट – डीएनए
बीबी बुल बुल कोण आहे ?
भारतातील पहिली व्यावसायिक महिला कुस्तीगीर बीबी बुल बुलचे खरे नाव सरबजीत कौर आहे.
सरबजीत कौरने आपले कुस्तीचे प्रशिक्षण पंजाबमधील जलंधर शहरातील ‘कॉन्टिनेन्टल रेसलिंग एंटरटेनमेंट’ अकादमी मधून घेतले आहे.
खालील व्हिडिओमध्ये आपण सरबजीत कौरची मुलाखत पाहू शकता.
कविता आरएसएसशी संबंधित आहे का ?
कविताचे संपूर्ण नाव कविता दलाल आहे. तिनेदेखील कॉन्टिनेन्टल रेसलिंग एंटरटेनमेंट’ अकादमी मधून प्रशिक्षण घेतले आहे.
कविता एक पॉवर-लिफ्टिंग आणि एमएमए चॅम्पियन असून 2017 मध्ये तिने ‘कविता देवी’ नावाने ‘वल्ड रेसलिंग एंटरटेनमेंट’ अर्थात डब्यूडब्यूईमध्ये पदार्पण केले.
कविता आपल्या सामन्यादरम्यान नेहमी केशरी रंगाचा कुर्ता घालते. परंतु, पडताळणीमध्ये कुठे ही कविता आरएसएसशी संबंधित असल्याचे आढळत नाही.
मूळ पोस्ट – इंडियन एक्सप्रेस
निष्कर्श
यावरून सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओमधील दोन्ही महिला भारतीय कुस्तीपटू असून आरएसएसशी संबंधित नाही. भ्रामक दाव्यासह हा जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)