इंडेन एक्स्ट्रा तेज सिलिंडरचा व्हिडिओ उत्तराखंडमधील ‘गोबर गॅस सिलिंडर’ म्हणून व्हायरल 

Social दिशाभूल करणाऱ्या I Misleading

इराण-यूएस-इस्रायल तणावामुळे भारतात एलपीजी सिलिंडरची कमतरता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर जांभळ्या रंगाच्या सिलिंडरचे फोटो व्हायरल होत आहेत. 

त्यासोबत दावा केला जातो की, उत्तराखंडमधील दोन भावांनी शेणापासून (गोबर गॅस) 18 किलो गॅस देणारा घरगुती सिलिंडर तयार केला आहे, जो फक्त 500 रुपयांत मिळतो.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा दावा आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल दावा दिशाभूल करणारा असून व्हिडिओ आणि फोटोमध्ये दाखवलेले जांभळे सिलिंडर गोबर गॅस नसून ‘इंडियन ऑइल कॉर्पोरेशन’चे व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडर आहेत. 

काय आहे दावा ?

व्हायरल फोटो आणि व्हिडिओमध्ये दोन व्यक्ती जांभळ्या रंगाचे सिलिंडर ट्रकमध्ये भरताना दिसतात.

युजर्स हे फोटो आणि व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “उत्तराखंडमध्ये दोन साधू बंधूंचा अनोखा उपक्रम; गोवऱ्यापासून तयार नैसर्गिक गॅस सिलिंडर अवघ्या ₹500 मध्ये उपलब्ध, स्वस्त आणि पर्यावरणपूरक ऊर्जेकडे मोठे पाऊल.”

मूळ पोस्ट – इंस्टग्राम | फेसबुक | फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

इंटरनेटवर उत्तराखंडमध्ये दोन भावांनी बायोगॅस सिलिंडर तयार केल्याची कोणतीही विश्वासार्ह बातमी किंवा माहिती उपलब्ध नाही. 

कीवर्ड सर्च केल्यावर आजतक न्यूजच्या वेबसाईटवर जांभळ्या रंगाच्या गॅस सिलिंडरबाबत एक बातमी आढळली. या बातमीत व्हायरल जांभळ्या सिलिंडरशी मिळता-जुळता फोटो मिळाला. 

तसेच फोटोसोबत दिलेल्या महितीनुसार,  हे सिलिंडर सुमारे 19 किलो वजनाचे इंडेन एक्स्ट्रा तेज असून इंडियन ऑइल कॉर्पोरेशन कंपनी तयार करते.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या अधिकृत वेबसाइटवर हा जांभळ्या रंगाचा सिलिंडर एलपीजी सिलिंडरच्या यादीत दिसतो. हा सिलिंडर फक्त औद्योगिक आणि व्यावसायिक वापरासाठी तयार करण्यात आला असून घरगुती वापरासाठी विकला जात नाही.

निष्कर्ष 

यावरून सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ आणि फोटोमधील जांभळ्या रंगाचे सिलिंडर हे गोबर गॅसचे नसून इंडियन ऑइल कॉर्पोरेशन निर्मित इंडेन एक्स्ट्रा तेज व्यावसायिक एलपीजी सिलिंडर आहेत. भ्रामक दाव्यासह व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम ट्विटर येथे फॉलो करा.)

Result Stamp

Title: इंडेन एक्स्ट्रा तेज सिलिंडरचा व्हिडिओ उत्तराखंडमधील ‘गोबर गॅस सिलिंडर’ म्हणून व्हायरल

Fact Check By: Sagar Rawate

Result: Misleading


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *