जे.जे. रुग्णालयामध्ये 5 हजार रुपयांमध्ये हृदयविकाराचे निदान होत असल्याचा फेक मेसेज व्हायरल? वाचा सत्य

Social दिशाभूल करणाऱ्या I Misleading

नवीन प्रकारच्या तंत्रज्ञानाच्यासाह्याने मुंबईतील जे.जे. रुग्णालयमध्ये 5 हजार रुपयांमध्ये हृदय विकाराचा निदान करण्यात येत आहे, या दाव्यासह एका संशोधनाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हिडिओसोबत केलेला दावा चुकीचा आहे.

काय आहे दावा ?

दीड मिनिटांच्या व्हिडिओमध्ये हृदय विकाराचा निदान करण्यात येणाऱ्या नवीन तंत्राज्ञाबद्दल महिती दिलेली आहे.

हा व्हिडिओ शेअर करताणा युजर्स कॅप्शनमध्ये लिहितात की, “आता हृदयविकाराची चिंता करणे थांबवा. नवीन तंत्र पहा : या प्रकारची अँजिओग्राफी ज्याद्वारे “हार्ट ब्लॉक्स” थेट काढले जातात…! “जेजे रुग्णालय, मुंबई येथे उपलब्ध” खर्च फक्त ₹ 5000 /.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

व्हायरल व्हिडिओमध्ये ‘In The Now’ लोगो दिसतो. ‘In The Now’च्या फेसबुक पेजवर 2017 पासून हा व्हिडिओ उपलब्ध आहे. यामध्ये सायटोस्पॉन्ज या नवीन प्रकारच्या वैद्यकीय उपकरणाची माहिती दिलेली आहे. 

या व्हिडिओमध्ये जेव्हा गोळीच्या आकाराची सायटोस्पॉन्ज गिळली जाते तेव्हा ती पोटात विरघळुन एक स्पंज तयार होतो. हा स्पंज अन्ननलिकेतील दहा दशलक्षाहून अधिक पेशी शोषून घेतो आणि दुसऱ्या टोकाला जोडलेल्या धाग्याने म्हणजेच तोंडाच्या बाहेर काढला जातो. या प्रक्रियेतून अन्ननलिकेच्या कर्करोगाचे निदान होऊ शकते.

साइटोस्पॉन्जची निर्मिती करणाऱ्या रिफ्लक्स कंपनीच्या वेबसाइटनुसार “ज्यांना छातीत जळजळ सारख्या समस्या आहेत, त्यांच्यासाठी एंडोस्कोपचा पर्याय म्हणून सायटोस्पॉन्ज अन्ननलिका कर्करोगाचे निदान करण्यात मदत करू शकते. बायोप्सीशिवाय भूल न देता हे केले जाऊ शकते. “

तसेच नर्सिंग टाईम्सच्या एका वृत्तात लिहिले होते की, “सायटोस्पॉन्जचा वापर इंग्लंडमध्ये प्रथमच युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमध्ये करण्यात आला होता. प्रयोगाला यश आल्यानंतर कॉलेजने हे तंत्र कायमस्वरूपी प्रॅक्टिस करता वारण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर नॉरफोक आणि नॉर्विच येथील वैद्यकीय विद्यापीठदेखील या तंत्राचा वापरत करत आहेत.”   

जे. जे. हॉस्पिटलमध्ये 5 हजारात अँजिओग्राफी उपचार होतात का ?

जे. जे. रुग्णालयातील डॉक्टर बन्सल यांनी मुंबई लाइव्ह या वेबसाईटवर स्पष्ट केले की, “जे. जे. रुग्णालयाच्या नावाने चुकीची माहिती व्हायरल होत आहे. अँजिओग्राफी उपचारासाठी 40 ते 50 हजार रुपयाचा खर्च येतो.”

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, जे. जे. रुग्णालयाच्या नावाने चुकीची माहिती व्हायरल होत आहे. जे. जे. हॉस्पिटलने व्हायरल मेसेज भ्रामक असल्याचे स्पष्ट केले आहे. 

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:जे.जे. रुग्णालयामध्ये 5 हजार रुपयांमध्ये हृदयविकाराचे निदान होत असल्याचा फेक मेसेज व्हायरल? वाचा सत्य

Written By: Sagar Rawate 

Result: Misleading