भारतातील डेअरी मिल्क कॅडबरीमध्ये “बीफ” असल्याचा दावा खोटा; वाचा सत्य

False Social

डेअरी मिल्क कॅडबरीच्या सर्व उत्पादनांमध्ये गोमांसाचा (बीफ) वापर केला जातो, असा दावा करणारा एक स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा स्क्रीनशॉट आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल स्क्रीनशॉट ऑस्ट्रेलियामधील उत्पादनांशी संबंधीत आहे. भारतातील कॅडबरी डेअरी मिल्कमध्ये गोमांसाचा (बीफ) वापरले जात नाही.

काय आहे दावा ?

व्हायरल ग्राफिक कर्डमध्ये कॅडबरी डेअरी मिल्कच्या वेबसाईटचा स्क्रीनशॉट दाखवलेला असून त्यामध्ये लिहिले आहे की, “आमच्या कोणत्याही उत्पादनामध्ये घटकांमध्ये जिलेटिन असल्यास, आम्ही वापरत असलेले जिलेटिन हे हलाल प्रमाणित असून ते गोमांसापासून तयार केलेले आहे.”

युजर्स हा स्क्रीनशॉट शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “आता कॅटबरी चॉकलेट खायचं का किंवा वाढदिवस वा अन्य प्रसंगी इतरांना,विशेषतः मुलांना आवर्जून भेट म्हणून घायचं का हा निर्णय आपण करायचा आहे. कंपनीच्या पुणे येथील ‌कार्यालयाने हे अधीकृतपणे पसिद्ध/मान्य केलं आहे.”

मूळ पोस्ट – फेसबुक

तथ्य पडताळणी

कीव्हर्ड सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल ग्राफिक कर्डमधील कॅडबरी डेअरी मिल्कच्या वेबसाईटचा स्क्रीनशॉट ऑस्ट्रेलिया येथील आहे. वेबसाइटवर दिलेल्या पत्त्यानुसार ही कंपनी ऑस्ट्रेलियातील मेलबर्न शहरात आहे.

या कंपनीने वेबसाइटवर हलाल संबंधित माहिती दिलेली आहे की, “आमच्या कोणत्याही ऑस्ट्रेलियन उत्पादनांमध्ये किंवा घटकांमध्ये जिलेटिन असल्यास ते हलाल प्रमाणित आणि गोमांसापासून (बीफ) तयार केलेले आहे.”

यावरून आपण हे स्पष्ट करू शकतो की व्हायरल झालेला स्क्रीनशॉट कॅडबरी ऑस्ट्रेलियाच्या वेबसाइटचे आहेत.

व्हायरल स्क्रीनशॉट संबंधित मधू किश्वर नावाच्या युजरने प्रश्न विचारल्यावर कॅडबरी डेअरी मिल्कने ट्विटर करत प्रत्युत्तर दिले की, “व्हायरल स्क्रीनशॉट भारतात बनवलेल्या माँडेलेझ उत्पादनाचा नाही. भारतात उत्पादित आणि विकले जाणारे डेअरी मिल्कचे सर्व उत्पादन शंभर टक्के शाकाहारी आहेत. तसेच रॅपरवरील हिरवे चिन्ह त्याचे प्रतीक आहे.” 

तसेच कॅडबरी डेअरी मिल्कने व्हायरल स्क्रीनशॉटचे खंडण करत ट्विटरवरून स्पष्ट केले की, “भारतातील सर्व कॅडबरी डेअरी मिल्कचे पदार्थ शाकाहारी आहेत.”

कॅडबरी डेअरी मिल्कचे याबाबत कंपनीचे काय म्हणणे आहे ?

पुढे, फॅक्ट क्रेसेंडोने माँडेलेझ इंडिया फुड प्रावेट लिमिटेडच्या प्रवक्त्या राखी बन्सल यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी सांगितले की “भारतात उत्पादित आणि विकली जाणारी सर्व उत्पादने शंभर टक्के शाकाहारी असून रॅपरवरील हिरव चिंन्ह त्याचे प्रतिक आहे. अशा नकारात्मक पोस्टमुळे आमच्या ब्रँडवरील ग्राहकांच्या विश्वासाला हानी पोहोचते. आम्ही ग्राहकांना विनंती करतो की, अशा कोणत्याही अफवानवर लक्ष देऊ नका.”

हिरवा रंग काय दर्शवतो ?

अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणमध्ये (FSSAI) बनवल्या जाणारा शाकाहारी, मांसाहारी आहे की, अंडी आहे, हे दर्शविण्यासाठी विविध रंगाच्या चिंन्हाचा वापर केला जातो.

एफएसएसएएआच्या (FSSAI) माहितीनुसार खाद्यपदार्था शाकाहारी दाखवण्यासाठी प्रत्येक पॅकेजवर ‘हिरव्या रंगाचे भरलेले वर्तुळ’ असे चिन्ह दिले जाते.

तसेच जर खाद्यपदार्थामध्ये मांसाहार, डुकराची किंवा गोमांस चरबी असेल तर त्या पॅकेजला विशिष्ट नाव आणि चिन्ह दिले जाते.

खालील आपण ऍमेझॉन इंडियाच्या वेबसाइटवर आपण कॅडबरी डेअरी मिल्क चॉकलेटच्या पॅकेटवर अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण विभागाने अनिवार्य केल्याप्रमाणे हिरवा चिन्ह पाहू शकतात.

हलाल म्हणजे काय ?

इस्लामिक शरिया कायद्याद्वारे परवानगी म्हणजे हलाल होय.

मुस्लमानाच्या कायद्याद्वारे योग्य असलेले अन्न किंवा वस्तू म्हणजे हलाल मान्य होय.

काय आहे हलाल कायदा ? 

1. इस्लामिक शरियत कायदा आणि फतव्यानुसार काहीही अशुद्ध नाही.

2. इस्लामिक शरिया कायदा आणि फतव्याद्वारे परवानगी नसलेल्या मनुष्याचा किंवा त्याच्या उत्पादनाचा त्यात समावेश नाही.

3. खालील तिन्ही श्रेणींमध्ये विभागली जाऊ शकेल असे कोणतेही अन्न उत्पादन अशुद्ध नसावे.

अ) (गंभीर) कुत्रे, डुक्कर आणि त्यांचे वंशज किंवा त्यांपैकी कोणाचाही जन्म;

ब) (मध्यम) जे वरील दोन अपवाद वगळता, जसे की रक्त, पू, विष्ठा इ.;

क) (सौम्य) म्हणजे पूर्णपणे स्तनपान करणा-या आणि दोन वर्षांचे न झालेल्या मुलाची लघवी.

हलाल संबंधित अधिक माहिती आपण येथे पाहू शकता.

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, व्हायरल स्क्रीनशॉटसोबत केलेला दावा चुकीचा आहे. भारतातील कॅडबरी डेअरी मिल्क उत्पादनामध्ये गोमांसाचा (बीफ) वापरले जात नाही. भारताच्या नावाने ऑस्ट्रेलियाच्या हलाल कॅडबरी डेअरी मिल्क वेबसाईटचा स्क्रीनशॉट व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:भारतातील डेअरी मिल्क कॅडबरीमध्ये “बीफ” असल्याचा दावा खोटा; वाचा सत्य

Written By: Sagar Rawate 

Result: False


Leave a Reply