या व्हिडिओमध्ये बांगलादेशात हिंदू शिक्षकाला राजीनामा देण्यास भाग पाडलेले नाही; वाचा सत्य

Update: 2024-08-29 17:45 GMT

बांगलादेशाच्या नावाने अनेक असंबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अशाच एक व्हिडिओमध्ये काही तरूण एका व्यक्तीच्या कॉलरला सिगारेटचे पाकीट स्टेपल करतात आणि शेवटी त्याच्यावर बाटलीतून पाणी ओततात.

दावा केला जात आहे की, बांगलादेशमध्ये मुस्लिम विद्यार्थ्यांनी हिंदू शिक्षकाचा अपमान करून त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडले.

पडताळणीअंती कळाले की, व्हिडिओमधील व्यक्ती पालिका अभियंता असून त्याचे नाव तौफिक इस्लाम आहे.

काय आहे दावा ?

युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “बांगलादेशातील आणखी एका हिंदू शिक्षकाचा त्यांनी एकदा शिकवलेल्या मुस्लिम विद्यार्थ्यांनी अपमान केला आणि त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडले. बांगलादेशात दररोज हजारो हिंदूंवर राजीनाम्याच्या पत्रांवर स्वाक्षरी करण्यासाठी दबाव आणला जात आहे.”

Full View

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

कीव्हर्ड सर्च केल्यावर कळाले की, बांगलादेशमधील चापैनवाबगंज नगरपालिकेत ही घटना घडली.

बीएन न्यूजच्या बातमीनुसार व्हिडिओमधील व्यक्ती तौफिक इस्लाम असून तो नगरपालिकेचा कार्यकारी अभियंता आहे. 19 ऑगस्ट रोजी तौफिकच्या कार्यालयात ड्रॉवरमधून सिगारेटचे दोन पॅक सापडल्यानंतर विद्यार्थी आंदोलकांनी राजीनामा देण्यास दबाव टाकला होता.

"ड्रगमुक्त बांगलादेश" निर्माण करणे हे विद्यार्थी चळवळीचे उद्दिष्ट होते.

या चळवळीचे प्रमुख इस्माईल हुसैन सिराझी यांच्या नेतृत्वाखाली तौफिकवर कारवाई करण्यात आली होती.

नगरपालिकेचे कार्यकारी अधिकारी मामून आणि रशीद यांनी बीएन न्यूजला दिली की, या घटनेनंतर तौफिक बेशुद्ध पडले आणि त्याना रुग्णालयात नेण्यात आले होते. तसेच विद्यार्थी कार्यकर्त्यांनी इतर दोन पालिका अधिकाऱ्यांना श्वेतपत्रिकेवर राजीनामे लिहिण्यास भाग पाडले होते. अधिक महिती येथेयेथे वाचू शकता.

अर्थात व्हिडिओमधील व्यक्ती हिंदू शिक्षक नाही.

मूळ पोस्ट – बीएन न्यूज | आर्काइव्ह

अधिक सर्च केल्यावर कळाले की, स्वदेश प्रतिदिन नामक युट्यूब चॅनलने या घटनेचा व्हिडिओ 19 ऑगस्ट रोजी अपलोड केला होता.

व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “चापैनवाबगंज नगरपालिकेचे नगराध्यक्ष, नगरसेवक आणि अधिकाऱ्यांनी राजीनामा दिला.”

या व्हिडिओमध्ये "ड्रगमुक्त बांगलादेश” या विद्यार्थी चळवळीचे प्रमुख इस्माईल हुसैन सिराझी सांगितले की, नागरी संस्थांच्या अधिकाऱ्यांनी स्वेच्छेने हे राजीनामे दिले आहेत.

खालील व्हिडिओमध्ये आपण एक मिनिटानंतर व्हायरल क्लिपमधील दृष्य पाहू शकता.

ज्यामध्ये तौफिक बेशुद्ध पडल्यावर आंदोलक विद्यार्थींनी त्यांची मदत केली. विद्यार्थी तौफिकला शुद्धिवर आणण्यासाठी त्यांच्या डोक्यावर पाणी ओततात आणि नंतर त्याला प्यायला पाणी देतात.

https://youtu.be/Q_0HpphD1g4?si=Z4stL3WzfyNA7-Bg&t=60

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओमधील व्यक्ती पालिका अभियंता असून त्यांचे नाव तौफिक इस्लाम आहे. तौफिकच्या कार्यालयाच्या ड्रॉवरमधून सिगारेटचे पाकिट सापडल्याने ‘ड्रगमुक्त बांगलादेश’ चळवळीच्या विद्यार्थी आंदोलकांनी त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडले होते. भ्रामक दाव्यासह हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

.container {

border: 2px solid #000;

background-color: #eee;

border-radius: 5px;

padding: 16px;

margin: 16px 0

}

.container::after {

content: "";

clear: both;

display: table;

}

.container img {

float: left;

margin-right: 20px;

border-radius: 50%;

}

.container span {

font-size: 20px;

margin-right: 15px;

}

@media (max-width: 500px) {

.container {

text-align: center;

}

.container img {

margin: auto;

float: none;

display: block;

}

}

Title:या व्हिडिओमध्ये बांगलादेशात हिंदू शिक्षकाला राजीनामा देण्यास भाग पाडलेले नाही; वाचा सत्य

Written By: Sagar Rawate

Result: Misleading

Tags:    

Similar News