कर्नाटक पोलिसांनी गणपती मूर्तीला अटक केल्याचा दावा भ्रामक ; वाचा सत्य

Update: 2024-09-23 06:47 GMT

कर्नाटकातील मंड्या शहरामध्ये 11 सप्टेंबर रोजी गणेश विसर्जनाच्या वेळी हिंसाचार झाला होता. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर पोलिस गणपती मूर्ती घेऊन जाणाऱ्या लोकांना ताब्यात घेतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. 

दावा केला जात आहे की, व्हायरल व्हिडिओमध्ये कर्नाटक पोलिसांनी गणपती मूर्तीलासुद्धा अटक केली. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, कर्नाटक पोलिसांनी गणपती मूर्तीला अटक केले नव्हते. त्यांनी मूर्ती ताब्यात घेऊन तिचे विसर्जन केले होते.

काय आहे दावा ?

युजर्स व्हायरल व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “देशाच्या इतिहासात प्रथमच काँग्रेस शासित कर्नाटक सरकारने गणपती बाप्पाला अटक केली.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

कीव्हर्ड सर्च केल्यावर द टाईम्स ऑफ इंडियाने 14 सप्टेंबर रोजी प्रकाशित केलेली बातमी आढळली. मंड्या  शहरातील घटनेची राष्ट्रीय तपास संस्थेतर्फे (एनआयए) चौकशी करण्याच्या मागणीसाठी निदर्शक गणेशमूर्ती घेऊन बेंगळुरूमधील टाऊन हॉलमध्ये जमले होते. परंतु, बेंगळुरू शहर नियमानुसार केवळ फ्रीडम पार्कमध्ये निषेधास परवानगी दिली होती.

परवानगी शिवाय टाऊन हॉलमध्ये आंदोलन चालू असल्याचे कळताच पोलिसांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेण्याआधी त्यांच्या कडून गणपती मूर्ती घेत सर्वप्रथम व्हॅनमध्ये ठेवली होती. माध्यम प्रतिनिधींनी त्या क्षणी फोटो घेतले. हे पोलिसांना समजताच त्यांनी व्हॅनमधून मूर्ती काढली आणि पोलिसांच्या वाहनांमध्ये हलवली.

अधिक सर्च केल्यावर कळाले की, पत्रकार यासिर मुश्ताक यांनी 14 सप्टेंबर रोजी केलेल्या ट्विटमध्ये घटनेशी संबंधित काही व्हिडिओ शेअर करत व्हायरल दाव्याचे खंडन केले.

पाहिल्या व्हिडिओमध्ये पोलिस आंदोलकांकडून गणपती मूर्ती ताब्यात घेत आहेत, तर दुसऱ्या क्लिपमध्ये पोलिस गणपती मूर्ती वाहनात ठेवताना दिसतात.

व्हिडिओशेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “सोशल मीडियावर युजर्स लिहित आहे की, बेंगळुरू पोलिसांनी गणपतीचा अनादर केला. परंतु, हे पूर्णपणे खोटे आहे. गणेशाची मूर्ती घेऊन आंदोलक आले होते. निषेधकर्त्याना आंदोलनाची परवानगी नव्हती. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले आणि स्वतःच्या सुरक्षेसाठी मूर्ती काढून घेतली आणि विसर्जन केले.”

तसेच बेंगळुरूमधील एस.जे पार्क पोलिस स्टेशने 15 रोजी ट्विट करत आंदोलनामधील गणपती मूर्ती विसर्जीत केल्याचे स्पष्ट केले.

मूळ पोस्ट – ट्विटर | आर्काइव्ह

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओमध्ये पोलिसांनी गणपतीच्या मूर्तीला अटक केली नाही. मंड्या शहरामध्ये झालेल्या हिंसाचाराविरोधत परवानगी शिवाय आंदोलन करत होते. त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांना अटक केली आणि गणपतीची मूर्ती ताब्यात घेऊन त्याचे विसर्जन केले.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Claim :  कर्नाटक पोलिसांनी गणपतीच्या मूर्तीलाच अटक केली.
Claimed By :  Social Media User
Fact Check :  MISLEADING
Tags:    

Similar News