‘सीएए’चे समर्थन करणाऱ्या भाजप नेत्यांना मारहाण करण्यात आली का?

Update: 2020-01-21 18:10 GMT

दार्जीलिंगमध्ये ‘सीएए’चे समर्थन करणाऱ्या पश्चिम बंगालच्या भाजप प्रदेशाध्यक्षांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना स्थानिकांनी मारहाण केल्याचा दावा करत एक व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांमध्ये व्हायरल होत आहे. नागरिकांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजप नेत्यांचे पाहा काय हाल करण्यात आले, असा दावा करत धर्मराज यादव आणि सुंदर बालकृष्णन यांनीही हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.

Full View

Archive

तथ्य पडताळणी

हा व्हिडिओ आम्ही नीट ऐकला त्यावेळी आम्हाला या व्हिडिओत "क्या गोरखा समझ गया ... हाँ ... क्या समझा गोरखा ... क्या बोला गया ... क्या बोला गया ... गोरखालैंड नहीं करेगा ... गोरखालैंड नहीं होगा ..." असे शब्द स्पष्ट ऐकू आले. त्यानंतर आम्ही याबाबत शोध घेतला असता आम्हाला अनेक यासंदर्भातील् विविध माध्यमांनी याबाबत दिलेले वृत्त आणि व्हिडिओज दिसून आले. यात झी न्यूजने 5 ऑक्टोबर 2017 रोजी दिलेले एक वृत्त दिसून आले.

https://youtu.be/TfvUIztjndI

Archive

त्यानंतर एबीपी न्यूज या वृत्तवाहिनीचा 6 ऑक्टोबर 2017 रोजीचा एक व्हिडिओ दिसून आला. या व्हिडिओत पश्चिम बंगालच्या भाजप अध्यक्ष दिलीप घोष आणि त्यांच्या समर्थकांवर गोरखलॅड समर्थकांनी हा हल्ला केल्याचे म्हटले आहे.

https://www.youtube.com/watch?v=mixfhRixiTk

Archive

दैनिक हिंदूस्थान टाईम्सच्या संकेतस्थळावर असलेल्या वृत्तातही ही मारहाण गोरखालँन्डच्या मुद्द्यांवर दार्जिलिंग येथे झाली असल्याचे स्पष्टपणे म्हटले आहे. गोरखालॅन्डच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या बंदच्या दिलीप घोष यांच्या नेतृत्वाखाली एक प्रतिनिधीमंडळ तेथे गेले होते. त्यावेळी गोरखा जनमुक्ती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना ही मारहाण केली. त्यांनी यासाठी बिनय तमांग आणि तृणमुल काँग्रेस यांना जवाबदार धरले होते

Archive

निष्कर्ष

यातून हे स्पष्ट झाले की हा व्हिडिओ तीन वर्ष जुना असून गोरखालँन्ड समर्थकांनी केलेल्या मारहाणीचा आहे. त्याचा आणि सीएए समर्थनाचा कोणताही संबंध नाही. त्यामुळे ही पोस्ट असत्य आढळली आहे. 

.hocal_container_hocal {

border: 2px solid #000;

background-color: #eee;

border-radius: 5px;

padding: 16px;

margin: 16px 0

}

.hocal_container_hocal::after {

content: "";

clear: both;

display: table;

}

.hocal_container_hocal img {

float: left;

margin-right: 20px;

border-radius: 50%;

}

.hocal_container_hocal span {

font-size: 20px;

margin-right: 15px;

}

@media (max-width: 500px) {

.hocal_container_hocal {

text-align: center;

}

.hocal_container_hocal img {

margin: auto;

float: none;

display: block;

}

}

Title:‘सीएए’चे समर्थन करणाऱ्या भाजप नेत्यांना मारहाण करण्यात आली का?

Fact Check By: Ajinkya Khadse

Result: False

Tags:    

Similar News