मणिपूरमध्ये भाजपचे कार्यकर्ते भाजपचा झेंडे जाळत असल्याचा तो व्हायरल व्हडिओ जुना; वाचा सत्य

Update: 2023-07-24 06:55 GMT

मणिपूरमध्ये जमावाद्वारे दोन आदिवासी महिलांची नग्न धिंड काडून सामूहिक अत्याचार केल्याच्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर देशभरातून रोष व्यक्त केला जात आहे. सत्तारुढ भाजपविरोधात निषेध मोर्चे आणि आंदोलन सुरू होत आहेत.

दरम्यान, सोशल मीडियावर भाजपचा झेंडा जाळल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यासोबत दावा केला जात आहे की, मणिपूरमध्ये भाजप कार्यकर्त्यांनीच भाजप पक्षाचे चिन्ह असलेला झेंडा जाळून निषेध व्यक्त केला.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ मगील वर्षीचा असून सध्याचा घटनेशी संबंधित नाही.

काय आहे दावा ?

व्हायरल व्हिडिओमध्ये लोक भाजप पक्षाचे झेंडे जाळत आहेत, तसेच व्हिडिओमध्ये एक व्यक्ती हा निषेध मणिपूरमधून केला जात आहे, असे सांगत आहे.

हा व्हिडिओ शेअर करताना युजर्स कॅप्शनमध्ये लिहितात की, “मणिपूरमधील भाजप कार्यकर्त्यांनी भाजपविरोधात निदर्शने केली. शेठ आणि मुख्यमंत्री बिरेन सिंग यांचे पुतळे भर चौकात जाळले.”

Full View

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओ जुना आहे.

काँग्रेसच्या सेवा दलने हा व्हिडिओ 30 जानेवारी 2022 रोजी शेअर केला होता.

हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर भाजप मणिपूरमध्ये बंडखोरी.”

https://twitter.com/CongressSevadal/status/1487826763593830401?s=20

उखरुल टाइम्सच्या बातमीनुसार गेल्या वर्षी मणिपूर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने उमेदवारांची यादी जाहीर केली होती. या यादीत तीन विद्यमान आमदार आणि अनेक इच्छुक उमेदवारांची नावे वगळण्यात आली होती.

वगळण्यात आलेल्या अनेक उमेदवारांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश घेतला तर काहींनी या निर्णयाचा विरोध करण्यासाठी भाजप पक्षाचे झेंडे जाळत आपला निषेध दर्शवला.

एनडीटीव्हीने युट्यूब चॅनलवर या घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “मणिपूर निवडणूकदरम्यान भाजपने उमेदवारांची नावे दिल्यानंतर मणिपूरमध्ये निदर्शने आणि राजीनामे.”

https://youtu.be/8-AgNJa0-nI?t=92

मणिपूरमधील सध्याची परिस्थिती

जमावाद्वारे महिलांवर अत्याचार झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र संतापाची लाट पसरली आहे. भारत आणि बाहेरच्या देशात या घटनेच्या निषेधार्थ मोर्चे काढण्यात येत आहे.

मणिपूरमध्ये ही निंदनीय घटना घडल्यानंतर तेथिल स्थानिक या दोन्ही पिडीत महिलांना न्याय मिळण्यासाठी मोर्चे काढत आहेत.

https://youtu.be/zuk7QTbhfno

पंतप्रधान नरेद्र मोदींनी या घटनेची दखल घेत म्हणाले की, ही निदनीय घटना असून या अत्याचारामध्ये सहभागी असलेल्या सर्व आरोपींविरोधात कारवाही केली जाईल.

तसेच न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांनी मणिपूर सरकारला गुन्हेगारांवर तातडीने कारवाई करा, अन्यथा आम्हाला कारवाई करावी लागेल, असा निर्वाणीचा इशारा दिला आहे.

याप्रकरणी आतापर्यंत मणिपूर पोलिसांनी चार जणांना अटक केली असून, व्हिडिओत पीडित महिलेला फरफटत ओढणाऱ्या व्यक्तीची ओळख जाहीर करण्यात आली आहे. त्याचे नाव हुइरेम हेरोदास मेईतेई (32) असून अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.

https://youtu.be/erKQdmYJfWU?t=80

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ गेल्या वर्षीचा आहे. मणिपूरमध्ये महिलांवर झालेल्या सामूहिक आत्याचाराचा या व्हिडिओशी काही संबंध नाही. चुकीच्या दाव्यासह जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

.hocal_container_hocal {

border: 2px solid #000;

background-color: #eee;

border-radius: 5px;

padding: 16px;

margin: 16px 0

}

.hocal_container_hocal::after {

content: "";

clear: both;

display: table;

}

.hocal_container_hocal img {

float: left;

margin-right: 20px;

border-radius: 50%;

}

.hocal_container_hocal span {

font-size: 20px;

margin-right: 15px;

}

@media (max-width: 500px) {

.hocal_container_hocal {

text-align: center;

}

.hocal_container_hocal img {

margin: auto;

float: none;

display: block;

}

}

Title:मणिपूरमध्ये भाजपचे कार्यकर्ते भाजपचा झेंडे जाळत असल्याचा तो व्हायरल व्हडिओ जुना; वाचा सत्य

Written By: Sagar Rawate

Result: False

Tags:    

Similar News