एबीपी माझाच्या नावाने अमरावती लोकसभेची फेक ओपिनियन पोल आकडेवारी व्हायरल

Update: 2024-04-29 18:31 GMT

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एबीपी माझा या न्यूज चॅनलचे लोगो असलेले ओपिनियन पोल सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यानुसार अमरावतीमध्ये काँग्रेसला सर्वात जास्त 44 टक्के मतदान मिळाले. पोस्ट शेअर करताना युजर्स दावा करत आहेत की, व्हायरल ओपिनियन पोल एबीपी माझाने जाहीर केला आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे ग्राफिक आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल ग्राफिक एबीपी माझाने जाहीर केले नाही.

काय आहे दावा ?

एबीपी माझाचा लोगो असणाऱ्या व्हायरल ग्राफिकमध्ये अमरावतीमध्ये पक्षांनुसार मतदानचा अंदाज लावण्यात आला आहे. त्यामध्ये काँग्रेस 44.36, भाजप 36.11, प्रहार 13.18 आणि अपक्ष व इतर 06.35 टक्के मतदान दाखविण्यात आले आहे.

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

सर्व प्रथम एबीपी माझाच्या वेबसाईटवर आणि त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर हे ग्राफिक आढळले नाही.

या उलट एबीपी माझाच्या फेसबुक आकाउंवर हे ग्राफिक कार्ड फेक असल्याचे सांगण्यात आले आहे. पोस्ट शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले होते की, "एबीपी माझाच्या नावे विविध लोकसभा मतदारसंघाच्या ओपिनियन पोलच्या खोट्या इमेज/स्क्रीनशॉट व्हायरल केले जात आहेत. या त्याचा एबीपी माझाशी काहीही संबंध नाही. या प्रकाराबाबत एबीपी माझा कायदेशीर कारवाईचे पाऊल उचलत आहे."

https://www.facebook.com/abpmajha/posts/pfbid022ij9kKuXjCFMYF8Mj86zC8t5Z3Pgyv15xGcHLtB7cPMf9J8ScPw8KoSTXqr6LswHl

तसेच काही युजर्स भाजपला आमरावती लोकसभेत 44.36 टक्के मतदान मिळाले, या दाव्यासह ग्राफिक शेअर करत आहेत. परंतु, एबीपी माझाने स्पष्ट केले की, व्हायरल ग्राफिक फेक असून त्यांनी शेअर केलेले नाही.

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, व्हायरल ग्राफिक बनावट आहे. एबीपी माझाने स्पष्ट केले की, व्हायरल ओपिनियन पोल बनावट असून त्यांच्या द्वारे शेअर करण्यात आले नाही.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

.hocal_container_hocal {

border: 2px solid #000;

background-color: #eee;

border-radius: 5px;

padding: 16px;

margin: 16px 0

}

.hocal_container_hocal::after {

content: "";

clear: both;

display: table;

}

.hocal_container_hocal img {

float: left;

margin-right: 20px;

border-radius: 50%;

}

.hocal_container_hocal span {

font-size: 20px;

margin-right: 15px;

}

@media (max-width: 500px) {

.hocal_container_hocal {

text-align: center;

}

.hocal_container_hocal img {

margin: auto;

float: none;

display: block;

}

}

Title:एबीपी माझाच्या नावाने अमरावती लोकसभेची फेक ओपिनियन पोल आकडेवारी व्हायरल

Written By: Sagar Rawate

Result: Altered

Tags:    

Similar News