काँग्रेस आणि ठाकरे गटात अनेक मतभेद असल्याच्या कथित बातम्या आपण माध्यमात पाहतो. सध्या सोशल मीडियावर उद्धव ठाकरेंचा एक व्हिडिओ शेअर करत दावा केला जात आहे की, काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरेंना भाषण करत असताना थांबवले आणि त्यांना व्यासपीठावरून उतरून जाण्यास सांगितले.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ एडिटेड आहे.

काय आहे दावा ?

व्हायरल व्हिडिओमध्ये ठाकरे म्हणतात की, “मी पाच मिनिटे बोलतो.”

युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केली उद्धव ठाकरेंची स्टेजवरून हाकलपट्टी.”

Archive

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

व्हायरल व्हिडिओमध्ये टीव्ही-9 मराठीचा लोगो आणि ही सभा वर्धामध्ये झाल्याचे दिसते.

हा धागा पकडून कीवर्ड सर्च केले असता कळाले की, उद्धव ठाकरेंनी 22 एप्रिल 2024 रोजी इंडिया अलायंन्स आणि महाविकास आघाडीच्या वर्धा येथील जाहीर सभेत हे भाषण केले होते.

टीव्ही-9 मराठी वाहिनीने युट्यूबवर या सभेचे थेट प्रक्षेपण केले होते.

https://www.youtube.com/live/oO1BLo9llqU?si=Nyj_5eoh8k8ofr2Q&t=5599

वरील संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यावर कळाले की, उद्धव ठाकरेंना कोणीही भाषण करण्यापासून रोखले नव्हते. उलट काँग्रेस पदाधिकारी त्यांना भाषण करण्याची विनंत करत होते.

मूळ व्हिडिओमध्ये 1 तास 33 मिनिट 19 सेकंदावर शरद पवार गटामधील वर्धा लोकसभा उमेदवार अमर काळे भाषण करत असताना त्यांना विनंती केली जाते की, “आपण आपले भाषण थांबवून उद्धव ठाकरेंना बोलून द्यावे त्यांना निघायचे आहे.”

उद्धव ठाकरे म्हणतात की, मी पाच मिनिट बोलतो. अमर काळे भाषण आणि इतर सदस्या त्यांना 10 ते 15 मिनिट बोलण्याची विनंती करतात.

उद्धव ठाकरे भाषणासाठी तयार झाल्यावर त्यांनी विरोधकांवर सडकून टीका केली की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा वर्ध्याला आहे होते तेव्हा त्यांनी "रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजनी." हा अभंग म्हटला होता. हे कोणी लिहून दिले ते मला माहीत नाही. पण हा माझा विठ्ठल माझ्यासमोर बसलेला आहे. (श्रोत्यांकडे हात दाखवत म्हणाले) मोदीजी हे रूप बघा, ह्याचा आनंद बघा, यांच सुख बघा, तुमच सुखनंतर बघा.” हे वक्तव्य आपण येथे पाहू शकता.

साम टीव्हीने आपल्या यूट्यूब चॅनलवरुन या प्रसंगाचा पूर्ण व्हिडिओ पोस्ट केला आहे. बातमी येथे वाचू शकता.

https://youtu.be/1qxBZ7n2xbk

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ एडिटेड आहे. उलट कार्यकर्ते उद्धव ठाकरेंना भाषण करण्यासाठी विनंती करत होते. खोट्या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)