व्हायरल व्हिडिओमध्ये तलवारबाजी करणारी महिला राजस्थाच्या उप-मुख्यमंत्री आहेत का ? वाचा सत्य

Social दिशाभूल करणाऱ्या I Misleading

एक महिला तलवारबाजी करतानाचा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, तलवारबाजी करणारी महिला राजस्थानच्या उपमुख्यमंत्री दिया कुमारी आहेत.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओसोबत केलेला दावा भ्रामक आहे. या व्हिडिओमध्ये तलवारबाजी करणारी महिला गुजरातमधील निकिता राठोड आहेत.

काय आहे दावा ?

व्हायरल क्लिपमध्ये महिला तलवारबाजी करताना दिसते.

युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “या आहेत राजस्थानच्या उपमुख्यमंत्री दिया कुमारी, एका कार्यक्रमात त्यांनी तलवारबाजी केली.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह 

तथ्य पडताळणी

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओमधील तरवारबाजी करणारी उपमुख्यमंत्री दिया कुमारी नाही.

निकिता राठोड नामक युजरने 22 जानेवारी रोजी हाच व्हिडिओ इंस्टाग्राम शेअर केला होता.

तसेच निकिता राठोड यांनी त्याच दिवशी अजून एक व्हिडिओ अपलोड केला होता. ज्यामध्ये त्या व्हायरल व्हिडिओमधील गुलाबी साडीमध्ये दिसतात.

निकिता राठोड या गुजरातच्या रहिवासी असून या पुर्वीदेखील यांनी इंस्टाग्रामवर तलबारबाजी करतानाचे व्हिडिओ शेअर केले आहेत.

राजस्थानच्या उपमुख्यमंत्री दिया कुमारी यांच्या नावाने हा तलवारबाजीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बीबीन्यूज गुजरात या युट्यूट चॅनवर मुलाखत देतांना निकिता राठोड यांनी व्हायरल दाव्याचे खंडन केले. मुलाखत येथे पाहू शकता.

खालील तुलनात्मक फोटो पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल की, व्हायरल व्हिडिओमध्ये तलवारबाजी करणारी महिला दिया कुमारी नसून निकिताबा राठोड आहेत.

निष्कर्श

यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओमध्ये तलवारबाजी करणारी महिला राजस्थानच्या उपमुख्यमंत्री दिया कुमारी नसून गुजरातच्या रहिवासी निकिता राठोड आहेत. भ्रामक दाव्यासह हा व्हिडिओ शेअर केला जात आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:व्हायरल व्हिडिओमध्ये तलवारबाजी करणारी महिला राजस्थाच्या उप-मुख्यमंत्री आहेत का ? वाचा सत्य

Written By: Sagar Rawate 

Result: Misleading


Leave a Reply