साताऱ्यात अल्पवयीन मुलीच्या गळ्याला चाकू लावणारा आरोपी ‘मुस्लिम’ नव्हता; वाचा सत्य

Social दिशाभूल करणाऱ्या I Misleading

गळ्याला चाकू लावून एक शाळकरी मुलीला मारण्याची धमकी देणाऱ्या एका अल्पवयीन मुलाचा भीतीदायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. सोबत दावा केला जात आहे की, हा आरोपी मुलगा मुस्लिम समुदयातील असून ‘लव्ह जिहाद’ नकार दिल्यामुळे त्याने मुलीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओसोबत केलेला दावा खोटा असून अरोपी मुस्लिम नाही. या प्रकरणामध्ये कोणतेही धार्मिक कारण नव्हते.

काय आहे दावा ?

व्हायरल व्हिडिओमध्ये एक मुलगा शाळकरी मुलीच्या गळ्याला चाकू लावतो. आसपासच्या लोकांनी प्रसंगावधान दाखवत मुलाच्या हातातून चाकू हिसकावून मुलीला सुरक्षित केले आणि त्या माथे फिरुला चोप दिला.

युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “महाराष्ट्रातील घटना, लव्ह जिहादमध्ये अडकवण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर एका शाळकरी मुलीचा गळा चाकूने कापण्याचा प्रयत्न करताना जिहादी ठार मारला गेला.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

सर्च केल्यावर कळाल कळाले की, व्हायरल व्हिडिओसोबत केलेला दावा दिशाभूल करणारा असून आरोपी मुस्लिम नाही. एकतर्फी प्रेमातून हे प्रकरण घडले होते.

काय आहे प्रकरण ? 

सातारा शहरात 21 जुलै रोजी एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने अल्पवयीन शाळकरी मुलीवर हल्ल्याचा प्रयत्न केला होता.  या वेळी उपस्थितांनी प्रसंगावधान दाखवून मुलास वेळीच ताब्यात घेतल्याने मुलीची सुटका झाली. तसेच संतप्त जमावाने हल्लेखोराला चोप दिला. 

दरम्यान घटनास्थळी पोलिस दाखल झाल्यावर त्यांनी आरोपीला ताब्यात घेतले आणि त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. परंतु, या ठिकाणी कुठेही आरोपी मुस्लिम असल्याचे म्हटलेले नाही. अधिक माहिती येथे, येथेयेथे वाचू शकता.

सातारा पोलिस अधीक्षक तुषार दोषी यांनी या प्रकरणाची माध्यमांना माहिती देताना सांगितले की, आरोपीचे नाव आर्यन वाघमळे असून तो आधी पीडितेच्या शेजारी राहत होता. मात्र, संबंधित मुलीचे कुटुंबीय डिसेंबर महिन्यात दुसरीकडे राहण्यासाठी गेले. त्यानंतरही तो तिला भेटण्यासाठी सतत त्रास देत होता. 

या आपोरीविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात पोक्सो कायदा, विनयभंग, दुखापत करणे आणि आर्म ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक माहिती येथेयेथे वाचू शकता.

पोलिसांचे खंडण

सदरील महितीच्या आधारे फॅक्ट क्रेसेंडोने शाहूपुरी पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक एस.जी. म्हेत्रे यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी सांगितले की, “ व्हायरल व्हिडिओसोबत केलेला दावा खोटा आहे. आरोपीचे नाव नाव आर्यन वाघमळे असून तो मुस्लिम नाही. एकतर्फी प्रेमातून त्याने हे कृत्य केले होते. आम्ही आरोपीला ताब्यात घेतले असून पुढे योग्यती कारवाई करणार आहोत.”

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओसोबत केलेला दावा दिशाभूल करणारा आहे. सातारामध्ये मुलगा शाळकरी मुलीलाच्या गळ्याला चाकू लावणारा आरोपी मुस्लिम नसून एकतर्फी प्रेमातून त्याने हे कृत्य केले होते. दिशाभूल करणाऱ्या दाव्यासह या घटनेला लव्ह जिहादचे नाव देत पसरवले जात आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम ट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:साताऱ्यात अल्पवयीन मुलीच्या गळ्याला चाकू लावणारा आरोपी ‘मुस्लिम’ नव्हता; वाचा सत्य

Fact Check By: Sagar Rawate  

Result: Misleading