निवडणूकीच्या नंतर कर्नाटकमध्ये जातीय हिंसाचाराचा बनावट व्हिडिओ.

राजकीय

कर्नाटकातील निवडणुकांमध्ये कॉंग्रेस आणि जेडी (एस) युतीने विजय मिळवला, त्यानंतर तिथे काँग्रेसबद्दल नकारात्मक वातावरण तयार करण्यासाठी एक दिशाभूल करणारा व्हायरल व्हिडिओ शेअर केला जात आहे.

जिस भड़वे को लगता है कि देश में 2019 में कांग्रेस आना चाहिए कांग्रेसी चमचे को ये वीडियो देख लेना चाहिए कर्नाटक में 1महीना भी नही हुआ है सरकार बने और ये हालात है वीडियो में मुस्लिम बाजार में मुस्लिमो ने हिन्दू और पुलिस को कैसे दौड़ा दौड़ा कर पिट रहा है भारत में सुरक्षित रहना है |

(“2019 मध्ये कॉंग्रेसने पुन्हा विजय प्राप्त करावा असे ज्या कोणत्याही नपुंसक व्यक्तिला वाटत असेल त्याने हा व्हिडिओ पहायला हवा. कर्नाटकमध्ये सरकारची स्थापना होऊन एक महिन्याचा कालावधी सुद्धा उलटलेला नाही आणि मुस्लिम बाजारमध्ये मुस्लिम लोक हिंदूंना आणि पोलिसांना मारत आहेत” अनुवादित मजकूर. मुस्लिम बाजार हे कर्नाटकातील एक बाजार क्षेत्र आहे).

ट्विटरवर 12 जूनच्या दुपारी ही पोस्ट टाकण्यात आली होती. पण ही पोस्ट व्हाट्सअॅपवर अनेक वेळा शेअर केली गेलेली आहे.

जिस भड़वे को लगता है कि देश में 2019 में कांग्रेस आना चाहिए
कांग्रेसी चमचे को ये वीडियो देख लेना चाहिए
कर्नाटक में 1महीना भी नही हुआ है सरकार बने और ये हालात है
वीडियो में मुस्लिम बाजार में मुस्लिमो ने हिन्दू और पुलिस को कैसे दौड़ा दौड़ा कर पिट रहा है

2019 मध्ये कॉंग्रेसने पुन्हा विजय प्राप्त करावा असे ज्या कोणत्याही नपुंसक व्यक्तिला वाटत असेल त्याने हा व्हिडिओ पहायला हवा. कर्नाटकमध्ये सरकारची स्थापना होऊन एक महिन्याचा कालावधी सुद्धा उलटलेला नाही आणि मुस्लिम बाजारमध्ये मुस्लिम लोक हिंदूंना आणि पोलिसांना मागे धावत जाऊन मारत आहेत.

भारत में सुरक्षित रहना है

भारतात सुरक्षित राहायचे आहे

https://twitter.com/intent/like?tweet_id=1006439218636156928

605

दुपार 1:03 – जून 12, 2018

855 लोक याबद्दल बोलत आहेत

Twitter Ads info and privacy

व्हायरल व्हिडिओ दाखवणारा सुनील करमुंगेचा ट्विट. सध्या या व्हीडियोला 782 रीट्विट्स आणि 618 लाईक्स मिळालेले आहेत.

जून 2018 मध्ये झारखंडमधील रांची येथे हा व्हिडिओ शूट करण्यात आला. आणि या व्हीडियोचा कर्नाटकातील निवडणुकीनंतरच्या कोणत्याही घटनेशी काहीही संबंध नाही.

हिंदी वृत्तपत्र जनसत्ता आणि दैनिक जागरण यांनी या घटनेवरील अहवाल त्यांच्या वेबसाईटवर पोस्ट केला.

तुम्ही येथे या लेखांचा संदर्भ घेऊ शकता:

जनसत्ता:
13 Jun 2018: https://www.jansatta.com/rajya/jharkhand-ranchi-clash-bjym-workers-and-shopkeepers-clash-in-ranchi/684532/

दैनिक जागरण:
13 Jun 2018: https://www.jagran.com/jharkhand/ranchi-beating-of-police-station-officer-18070566.html

विविध तथ्य तपासणी (फॅक्ट चेकिंग) वेबसाईट्सने हा व्हिडिओ हॉक्स (फसवण्यासाठी टाकण्यात आलेला) म्हणून चिन्हांकित केला.

एसएम हॉक्स स्लेयरने या व्हीडियोला #खोटीबातमी म्हणून चिन्हांकित केले.

तर एएलटीन्यूजने एक अहवाल तयार केला ज्या अहवालाने आमच्या निष्कर्षांची पुष्टी केली.

13 जून 2018 रोजीचा जनसत्ताचा लेख

13 जून 2018 रोजीचा दैनिक जागरणचा लेख