तथ्य पडताळणी: जळगावमध्ये खरंच दहशतवाद्यास पकडलं का?

खोटी न्यूज I Fake News
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

जळगावमधील डी मार्टमध्ये दहशतवाद्यास पकडल्याचा व्हिडीओ सध्या फेसबुकवर व्हायरल होत आहे. अनेकांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.

Archive post

तथ्य पडताळणी

काही जणांकडून दावा करण्यात येत आहे की हा व्हिडीओ विरार येथील आहे. पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी हा व्हिडीओ नेमका कुठला आहे याबाबत सांगता येत नसल्याचे म्हटले आहे. पालघरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अर्नाळा या ठिकाणी पोलिसांनी केलेल्या मॉक ड्रीलचा हा व्हिडीओ असल्याचे सांगितले.

निष्कर्ष

जळगावमध्ये दहशतवादी पकडण्यात आल्याचा व्हिडीओ खोटा असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. अशा प्रकारची कोणती मॉक ड्रील जळगावमध्ये झाल्याचेही त्यांनी नाकारले आहे. पालघर पोलिसांनी आपल्या हद्दीत अशा प्रकारची मॉकड्रील झाल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे हा व्हिडीओ चुकीच्या पध्दतीने प्रसारित करण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. फॅक्ट क्रिसेडोच्या पडताळणीत हा व्हिडीओ खोटा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

False Title: तथ्य पडताळणी: जळगावमध्ये खरंच दहशतवाद्यास पकडलं का?
Fact Check By: Dattatray Gholap 
Result: False (ही बातमी खोटी आहे)

 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •