लोखंडाच्या तप्त सळईने व्यक्तीच्या शरीरावर डागण्या देतानाचा व्हिडिओ लातुरचा नाही; वाचा सत्य

Social दिशाभूल करणाऱ्या I Misleading

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका व्यक्तीला लोखंडाच्या तप्त सळईने पायाला चटके दिले जातात.

दावा केला जात आहे की, ही घटना लातूरमध्ये घडली होती.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओमधील घटना भोकरदनच्या जानेफळ गावातली आहे.

काय आहे दावा ?

व्हायरल व्हिडिओमध्ये एका व्यक्तीला अर्धनग्न करुन त्याला लोखंडाच्या तप्त सळईने पायाला चटके दिले जातात.

युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, आता लातूरच्या जानेफळ गावात महाशिवरात्रीच्या दिवशी कैलास बोऱ्हाडे या तरूणाची कातडी सोलल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. लोखंडाच्या तप्त सळईने त्याच्या शरीरावर डागण्या देण्यात आल्या; कारण काय तर तो मंदिरात गेला !”

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील हाच व्हिडिओ आपल्या ट्विटरवर शेअर केला असून लोकमतने यावर बातमी केली आहे.

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम जितेंद्र आव्हाड यांनी शेअर केलेल्या व्हायरल व्हिडिओच्या कमेंटमध्ये लातूर पोलिसांने रिप्लाय केले की, सदरील घटना लातूरमध्ये घडली नाही.

मूळ पोस्ट – ट्विटर | आर्काइव्ह

तसेच व्हायरल व्हिडिओमध्ये ‘अन्वा जालना’ असे लिहिल्याचे आढळले.

हा धागा पकडून कीव्हर्ड कर्च केल्यावर कळाले की, लोकमतने 5 मार्च रोजी हाच व्हिडिओ शेअर करत महिती दिली की, ही घटना जालना जिल्ह्यच्या भोकरदन तालुक्यातील जानेफळ (गायकवाड) गावात घडली होती.

काय आहे संपूर्ण घटना ?

पीडित व्यक्तीचे नाव कैलास गोविंदा बोराडे (वय 33) असून तो आणवा गावाचा रहिवासी आहे. कैलास 26 फेब्रुवारी रोजी जानेफळ गावाच्या रस्त्यावरील वटेश्वर महादेव मंदिरात दर्शनासाठी गेले होते. यावेळी आरोपी सोनू ऊर्फ भागवत सुदाम दौंड याने मंदिरात महिला दर्शन घेत आहेत, तू दर्शनासाठी मंदिरात जाऊ नको, असे म्हणत कैलासला अडवले. त्यानंतर दौंड याने जुन्या वाद उकरून काढत कैलासला मारहाण केली, त्याला अर्धनग्न करत यांच्या पायाला, पोटाला, मानेवर, हाताच्या तळव्यावर, पार्श्वभागावर गरम लोखंडी रॉडने चटके दिले. अधिक माहिती येथे, येथेयेथे वाचू शकता.

पारध पोलिस ठाण्याचे स.पो.नि संतोष माने यांनी सांगितले की, या प्रकरणी आरोपी भागवत सुदाम दौड अटक केली असून त्याचा भाऊ (ठाकरे गट तालुकाप्रमुख) नवनाथ दौड सध्या फरार आहे. अधिक महिती येथे पाहू शकता.

पीडित कैलास बोराडे यांनी माध्यमांशी बोलताना संपूर्ण घटना सांगितली आणि आपल्याला न्याय मिळण्याची मागणी केली.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

व्हायरल व्हिडिओची दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कैलास बोराडे याच्याशी संपर्ण साधला. तसेच ही घटना विभानसभेत सांगत आरोपींना विरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अर्थात मकोका लावण्याची मागणी केली.

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओमधील घटना लातूर जिल्ह्यातील नसून जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यामधील जानेफळ गावामध्ये घडली होती. भ्रामक दाव्यासह हा व्हिडिओ लातूर जिल्ह्याचा म्हणून शेअर केला जात आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:लोखंडाच्या तप्त सळईने व्यक्तीच्या शरीरावर डागण्या देतानाचा व्हिडिओ लातुरचा नाही; वाचा सत्य

Written By: Sagar Rawate  

Result: Misleading