कुत्र्यांचा गार्डनमध्ये खेळणाऱ्या मुलांवर हल्ला केल्याचा हा व्हिडिओ भारतातील नाही; वाचा सत्य

Missing Context Social

पार्कमध्ये लहान मुले खेळत असताना दोन पिसाळलेले कुत्र्यांनी एका लहान मुलावर हल्ला केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

दावा केला जात आहे की, हा व्हिडिओ कल्याण खडकपाडा अरिहंत सोसायटीचा आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ कल्याणचा नसून ब्राझीलचा आहे.

काय आहे दावा ?

व्हायरल व्हिडिओमध्ये पार्कमध्ये खेळणाऱ्या लहान मुलावर दोन कुत्रे हल्ला करतात. त्या पैकी एक कुत्रा मुलाच्या पायाचा चावा घेतो आणि लोकांनी काठ्याने मारुन पण तो मुलाला सोडत नाही. 

हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “कल्याण खडकपाडा अरिहंत सोसायटीमध्ये भटके कुत्र्यांचा गार्डन मध्ये खेळणाऱ्या लहान मुलांवर हल्ला.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओ भारताशी संबंधित नाही.

Notícias Paralelas नामक ट्विटर अकाउंटने हाच व्हिडिओ 16 नोव्हेंबर रोजी शेअर केला होता.

कॅप्शनमध्ये ब्राझिलियन पोर्तुगीज भाषेत लिहिले होते की, “एसपीच्या उत्तर विभागातील क्रीडांगणावर पिटबुल कुत्र्यांनी दोन मुलांवर अमानुष हल्ला केला.”

मूळ पोस्ट – ट्विटर

हा धागा पकडून अधिक सर्च केल्यावर कळाले की, ब्राझीलच्या साओ पाउलो उत्तर विभागातील विला गिल्हेर्मे येथील खेळाच्या मैदानात पिटबुल कुत्र्यांनी हल्ला केल्याने तीन मुले जखमी झाली होती.

लहान मुले तेथे खेळत असताना कुत्र्यांनी त्यांच्यावर हल्ला केल्यानंतर तेथील रहिवाशांनी मुलांना वाचवले आणि दवाखान्यात दाखल केले होते.

सीएनएनच्या बातमीनुसार या हल्ल्यात 12 वर्षांची मुलगी आणि 11 वर्षांचा मुलागा जखमी झाले होते. तसचे दोघांची प्रकृती स्थिर असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आले.

अधिक महिती येथेयेथे वाचू शकता.

मूळ पोस्ट – एसबीटी न्यूज

कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील कुत्र्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून 2024 मध्ये 18,800 नागरिकांचा यांनी चावा घेतला आहे.

डिसेंबर महिन्यात कल्याणमध्ये कुत्र्यांच्या हल्ल्याने एकाचा मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

हल्ला क्र. 1

कल्याण गोल्डन पार्क परिसरातील तानाजी नगर येथे कुत्र्याच्या हल्ल्यात शुभम चौधरी नामक 27 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

हल्ला क्र. 2

कल्याण पश्चिमेतील शिवाजीनगर परिसरात राहणाऱ्या अर्थव श्रीवास नामक 8 वर्षींय मुलाच्या गुप्तांग आणि तोंडाला कुत्र्याने चावा घेतला होता. त्याला रूग्णालयात उपचार करून प्रकृती स्थिर झाल्यावर घरी सोडण्यात आले.

हल्ला क्र. 3

कल्याणजवळील टिटवाळा येथील रिजन्सी कॉम्प्लेक्समध्ये  भटक्या कुत्र्यांच्या टोळक्याने एका वृद्ध महिलेवर हल्ला करून तिचे लचके तोडले. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सविस्तर बातमी येथे, येथेयेथे वाचू शकता.

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ भारतातील नाही. ही घटना 14 नोव्हेंबर रोजी ब्राझीलमधील उत्तर विभाग साओ पाउलो भागातील विला गिल्हेर्मे मधील एका खेळाच्या मैदानात घडली होती. भ्रामक दाव्यासह कल्याणमधील घटना म्हणून व्हायरल व्हिडिओ शेअर केला जात आहे.

Avatar

Title:कुत्र्यांचा गार्डनमध्ये खेळणाऱ्या मुलांवर हल्ला केल्याचा हा व्हिडिओ भारतातील नाही; वाचा सत्य

Written By: Sagar Rawate  

Result: Missing Context