
बलुचिस्तान लिबरल आर्मीने जाफर एक्स्प्रेसचे अपहरण केले आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तान आणि चीनला धमकी दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, “बीएलएने पाक आणि चीनला धमकी दिली आहे.”
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ 6 वर्षांपूर्वीचा आहे.
काय आहे दावा ?
व्हायरल व्हिडिओमध्ये तोंडावर मास्क लावलेला एक व्यक्ती म्हणतो की, बलुचिस्तान लिबरल आर्मीचे प्रमुख असलम बलोच यांनी पाकिस्तान आणि चीनला बलुचिस्तानमधून निघून जा अन्यथा परिणामाला तयार रहा, असे सांगितले आहे.
युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “BLA ने पाकिस्तान आणि चीनला इशारा दिला आहे – बलुचिस्तान सोडा, नाहीतर मृत्यूला सामोरे जा!”
मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओ 6 वर्षांपूर्वीचा आहे.
द वॉयस ऑफ ह्यूमैनिटी नामक फेसबुक पेजने 19 मे 2019 रोजी हाच व्हिडिओ शेअर केल्याचे आढळले.
कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “बीएलए माजीद ब्रिगेडने रविवारी एक व्हिडिओ संदेश जारी करून चीनला “बलूच नागरिकांना क्रूरपणे दडपण्यासाठी पाकिस्तानला मदत करणे थांबवावे” असा इशारा दिला. त्यांनी असेही म्हटले आहे की चीनच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानी सैन्याच्या हातून अनेक कुटुंबांना त्रास सहन करावा लागला आहे.”
अधिक सर्च केल्यावर ईटीव्ही भारत वेबसाईटवर व्हायरल व्हिडिओचा स्क्रिनशॉट आढळला. सोबत दिलेल्या बातमीनुसार 11 मे 2019 रोजी बलुच लिबरेशन आर्मीच्या माजीद ब्रिगेडच्या चार सदस्यांनी ग्वादरमधील एका पंचतारांकित हॉटेलवर हल्ला केला होता.
पाकिस्तानी कमांडोंसोबत 26 तास चाललेल्या युद्धानंतर काही दिवसांतच हा व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आला होता. अथिक महिती येथे, येथे व येथे वाचू शकता.
जाफर एक्सप्रेस अपहरण
बलुचिस्तान लिबरल आर्मीने 11 मार्च रोजी पाकिस्तानात पेशावरच्या दिशेने जाणाऱ्या जाफर एक्स्प्रेसचे अपहरण करुन 214 प्रवाशांना ओलीस ठेवल्याचा दावा केला आहे. अधिक महिती येथे वाचू शकता.
निष्कर्ष
यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ 6 वर्षांपूर्वीचा आहे. 2019 मध्ये बलुचिस्तान लिबरल आर्मीने व्हिडिओद्वारे पाकिस्तान आणि चीनला धमकी दिली होती. भ्रामक दाव्यसह हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:2019 मध्ये बीएलएने पाक आणि चीनला धमकी दिल्याचा व्हिडिओ जाफर एक्सप्रेस अपहरणाशी जोडून व्हायरल
Written By: Sagar RawateResult: Misleading
