
प्रयागराजमधील महाकुंभ परदेशी लोकांसाठी आकर्षणाचा विषय ठरत आहे. याच पार्श्वभूमीवर महाकुंभ गंगा घाटाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, “आंतरराष्ट्रीय विमान प्रयागराज येथे लँडिंग होण्यापूर्वी परदेशी पायलटने गंगा घाटचे हे दृष्य पाहून घोषणा केली.”
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ प्रयागराज येथे लँड होणाऱ्या विमानातून नाही तर ड्रोन द्वारे काढण्यात आलेला आहे.
काय आहे दावा ?
व्हायरल व्हिडिओमध्ये महाकुंभच्या गंगा घाट वरील भाविकांची गर्दी दिसते आणि पायलट सूचना करतानाचा आवाज ऐकू येतो.
युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “आंतरराष्ट्रीय विमान प्रयागराज येथे लँडिंग… परदेशी पायलटची घोषणा.”
मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओ विमानातून काढण्यात आलेला नाही.
अन्वेश पटेल नामक इंस्टग्राम अकाउंटने हाच व्हिडिओ 23 जानेवारी रोजी शेअर केला होता.
कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “हा व्हिडिओ अन्वेश पटेल याने काढला असून यामधील व्हॉइसओव्हर मानवी आणि पूर्णपणे कॉपीराइट केलेला आहे.”
मूळ – इंस्टग्राम
पुढे फॅक्ट क्रेसेंडोने अन्वेश पटेल यांच्याशी संपर्क साधल्यावर त्याने स्पष्ट केले की, हा विमानातून काढण्यात आलेला नाही. पुढे ते सांगतात की, “हा व्हिडिओ मी ड्रोनद्वारे काढला असून यामधील पायलटचा व्हॉइसओव्हर एआय आणि मित्राच्या साह्याने तयार केला आहे.”
निष्कर्ष
यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ विमानातून काढलेला नाही. मुळात अन्वेश पटेल नामक व्हिडिओग्राफरने हा व्हिडिओ ड्रोनच्या साह्याने काढला असून त्याच्या मित्राच्या मदतीने परदेशी पायलटचा व्हॉइसओव्हर दिला आहे. भ्रामक दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:महाकुंभचा ड्रोनशॉटने काढलेला व्हिडिओ आंतरराष्ट्रीय विमानातील पायलटची घोषणा म्हणून व्हायरल
Fact Check By: Sagar RawateResult: Misleading
