रशियातील भूकंपाशी जोडून असंबंधित व्हिडिओ व्हायरल

Social दिशाभूल करणाऱ्या I Misleading

रशियामध्ये 30 जुलै रोजी सकाळी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवल्यानंतर तेथे अनेक ठिकाणी नुकसान झाले आणि त्सुनामीचाही इशारा देण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर भूकंप आणि त्सुनामीचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर होत आहे. दावा केला जात आहे की, या व्हायरल व्हिडिओमधील क्लिप्स रशियातील भूकंप आणि त्सुनामीच्या आहेत.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओमधील क्लिप्स रशियात नुकताच आलेल्या भूकंप आणि त्सुनामीशी संबंधित नाही.

काय आहे दावा ?

व्हायरल व्हिडिओमध्ये भूकंप आणि त्सुनामीचे क्लिप्स दाखवलेल्या आहेत.

युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “रशिया मधी भूकंप.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

खालील सर्व क्लिप्स रिव्हर्स इमेजद्वारे सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओ रशिया भूकंपाशी संबंधित नाही.

क्लिप क्र.1

रशियामध्ये भूकंपाचे धक्के 30 जुलै रोजी जाणवले होते. परंतु, व्हायरल व्हिडिओमधील ही क्लिप 2 वर्षांपूर्वीची आहे. 

अमेरिकन तटरक्षक दल 6 फेब्रुवारी 2023 रोजी प्रशिक्षण मोहीमेवर असताना कोलंबिया नदेजवळ एक होडी (बोट) समुद्रलाटेने उलटताना दिसली आणि तटरक्षक दलने होडीमधील लोकांना वाचवले होते. अधिक महिती येथे, येथेयेथे वाचू शकता. 

मूळ पोस्ट – युट्यूब

क्लिप क्र.2

भूकंपाची ही क्लिप 4 महिण्यापूर्वीची असून हे दृष्य थायलंडच्या राजधानी बँकॉकमधील महानखोन इमारत 78 व्या मजलाचे आहे. अधिक महिती येथेयेथे पाहू शकता.

मूळ पोस्ट – इंस्टग्राम

क्लिप क्र.3

भूकंपामुळे मेट्रो हलतानाचा व्हिडिओ मेट्रो न्यूजने 6 फेब्रुवारी 2023 रोजी त्यांच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर शेअर केला होता. सोबत दिलेल्या बातमीनुसार थायलंडची राजधानी बँकॉकमधील एका स्टेशनवरील हे दृश्य आहेत.

मूळ पोस्ट – मेट्रो न्यूज

क्लिप क्र. 4, 6 आणि 8

या क्लिपमध्ये समुद्र किनाऱ्यावरील घरांवर लाटा आदळताना दिसतात. लाइव्ह स्टॉर्म्स मीडिया नामक युट्यूब चॅनलने 3 फेब्रुवारी 2021 रोजी या क्लिपची एक मोठी आवृती शेअर केलेली आढळली. सोबत दिलेल्या माहितीनुसार ही घटना अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्सच्या प्लायमाउथ काउंटीमधील समुद्रकिनाऱ्यावरील स्किटुएट शहरात घडली होती. पूर आल्याने या भागातील समुद्रकिनाऱ्यावरील घरांवर मोठ्या लाटा आदळल्या होत्या.

मूळ पोस्ट – लाइव्ह स्टॉर्म्स मीडिया

क्लिप क्र. 5

या क्लिपमध्ये भूकंपामुळे कार आणि इमारती हादरताना दिसतात. डेलीमोशन या व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्मवर हिच क्लिप 8 ऑगस्ट 2024 रोजी शेअर केलेली आढळली. सोबत दिलेल्या माहितीनुसार जपानमधील क्युशू बेटावर हा भूकंप झाला होता.

मूळ पोस्ट –  डेलीमोशन

क्लिप क्र. 7

या क्लिपमध्ये भूकंपामुळे इमारती, वाहने आणि विद्युत खांब हालताना दिसतात. एका इंस्टाग्राम पेजने हाच व्हिडिओ 18 जानेवारी 2024 रोजी केला होता. कॅप्शननुसार, हा व्हिडिओ जपानमधील आहे.

मूळ पोस्ट – इंस्टग्राम

क्लिप क्र. 9

या क्लिपमध्ये भूकंपामुळे नदीत होडी अस्थिर होताना दिसतात. इनसाइड एडिशन नामक युट्यूब चॅनलने हाच व्हिडिओ 21 सप्टेंबर 2017 रोजी शेअर केला होता. सोबत दिलेल्या महितीनुसार मेक्सिकोमध्ये 7.1 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला तेव्हा अमेरिकन पर्यटकांचा एक गट बोटीतून प्रवास करत होता. अधिक महिती येथेयेथे वाचू शकता. 

मूळ पोस्ट – युट्यूब

क्लिप क्र. 10 

या क्लिपमध्ये समुद्र किनाऱ्यावर एक विनाशकारक लाट आलेली दिसते. आय फनी या प्लॅटफॉर्मवर हिच क्लिप 21 एप्रिल 2025 रोजी शेअर केले आढळले. 

अर्थात ही क्लिप रशियामध्ये अलिकडेच झालेल्या भूकंपाशी संबंधित नसून त्या आधीपासून सोशल मीडियावर उपलब्ध आहे.

तसेच व्हायरल क्लिपच्या शेवटी एक चतुर्थांश सेकंदांवर काही संदेश लिहिलेले ग्राफिक दिसते.

या संदेशाचे भाषांतर केल्यावर कळाले की, ग्राफिकमध्ये स्पॅनिश भाषेत “यापैकी काहीही खरे नाही.” असे लिहिलेले आहे.

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होत की, व्हायरल व्हिडिओमधील क्लिप्स रशिया भूकंप आणि त्सुनामीशी संबंधित नाही. खोट्या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे. 

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम ट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:रशियातील भूकंपाशी जोडून असंबंधित व्हिडिओ व्हायरल

Fact Check By: SAGAR RAWATE 

Result: Misleading