धुरंधर चित्रपटाचा इफेक्ट म्हणून असंबंधित व्हिडिओ व्हायरल; वाचा सत्य

Social दिशाभूल करणाऱ्या I Misleading

आदित्य धर दिग्दर्शित धुरंधर : द रिव्हेंज चित्रपटामध्ये एक गुप्तहेर पाकिस्तान असल्याची कथा आहे. या पार्श्वभूमीवर एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये पाकिस्तान पोलिस रस्त्यावरील लोकांची करताना दिसते. दावा केला जात आहे की, “धुरंधर चित्रपट रिलिज झाल्यावर पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली असून लयारीमध्ये स्थानिक पोलिस भारताचे गुप्तहेर शोधत आहेत.”

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओचा धुरंधर चित्रपटाशी काहीही संबंध नाही.

काय आहे दावा ?

व्हायरल व्हिडिओमध्ये पाकिस्तानमधील पोलिस रस्त्यावरील गरीब लोकांची चौकशी करताना आणि संशयितांना ताब्यात घेताना दिसतात.

युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “धुरंधर 2 नंतर पाकिस्तानात सर्वत्र घबराट पसरली आहे. आता ते लयारीमध्ये प्रत्येक रस्त्यावर ‘भारतीय गुप्तहेरांचा’ शोध घेत आहेत.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओ धुरंधर चित्रपटाशी संबंधित नाही.

अँटी-नार्कोटिक अँड क्राईम कंट्रोल (एएनसीसी) नामक एका पाकिस्तानी स्वयंसेवी संस्थेने हाच व्हिडिओ 25 डिसेंबर 2025 रोजी आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर शेअर केला होता.

पुढे अधिक सर्च केल्यावर कळाले की, एएनसीसी या एनजीओने स्वयंसेवक आणि पोलीसांसोबत मिळून पाकिस्तानमधील हैदराबाद येथे संशयित अमली पदार्थ व्यसनींना ओळखत त्यांना ताब्यात घेतल्याचे अनेक व्हिडिओ फेसबुकवर शेअर केलेले आहेत.

मूळ पोस्ट – फेसबुक

एएनसीसीच्या अधिकृत वेबसाइटवर वरील उपलब्ध महितीनुसार, ही संस्था कायदेशीर कारवाईसाठी अमली पदार्थ वापरकर्त्यांना ओळखण्यात पाकिस्तान पोलिसांची मदत करते.

तसेच व्हायरल व्हिडिओमध्ये पोलिसांशी संवाद साधताना दिसणारा व्यक्ती एएनसीसीचे ऑपरेशन्स डायरेक्टर युनूस अमीन आहे.

मूळ वेबसाइट – एएनसीसी

युनूस अमीनशी संबंधित असलेल्या ‘ग्राउंड ऑपरेशन’ नावाच्या दुसऱ्या फेसबुक पेजवर असेच व्हिडिओ शेअर केलेले आहेत.

या व्हिडिओसमध्ये ही संस्था आणि स्थानिक पोलिसांनी संयुक्तपणे राबवलेली एकत्रत अमली पदार्थविरोधी कारवाई करताना दिसते.

मूळ पोस्ट – फेसबुक 

अर्थात व्हायरल व्हिडिओ गुप्तहेर तपासाचा नसून, एका सुनियोजित रस्त्यावरील अमली पदार्थ वापरकर्त्यांविरोधात केलेल्या कारवाईचा भाग आहे.

आखाती देशात बंदी

‘धुरंधर: द रिव्हेंज’ हा चित्रपट, संयुक्त अरब अमिरात, सौदी अरेबिया, कतार, कुवेत, ओमान आणि बहरीन या देशांनी एकत्रितपणे चित्रपटगृहांतील प्रदर्शनावर बंदी घातली आहे. अधिक महिती येथेयेथे वाचू शकता.

निष्कर्ष 

यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ धुरंधर भाग 2 या चित्रपटाशी संबंधित नाही. एएनसीसी संस्था आणि स्थानिक पोलिसांनी संयुक्तपणे अमली पदार्थविरोधी केलेल्या कारवाईचा व्हिडिओ भ्रामक दाव्यासह व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Result Stamp

Title: धुरंधर चित्रपटाचा इफेक्ट म्हणून असंबंधित व्हिडिओ व्हायरल; वाचा सत्य

Fact Check By: Sagar Rawate

Result: Misleading


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *