पाकिस्तानमध्ये रेडियेशन लिक जाल्याचा दावा करत असंबंधित जुना व्हिडिओ व्हायरल

Social दिशाभूल करणाऱ्या I Misleading

भारत-पाक संघर्षादरम्यान एका स्फोटचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, “पाकिस्तानमध्ये न्यूक्लियर रेडियेशन लिक झाले आहे.”

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ 2015 पासून सोशल मीडियावर उपलब्ध आहे.

काय आहे दावा ?

व्हायरल व्हिडिओमध्ये एका शहरातील स्फोट दाखवला आहे.

युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “पाकिस्तान मध्ये न्यूक्लियर रेडिएशन का पसरले, का मेडिकल इमरजेंसी लावण्यात आली.त्याचे उत्तर किराना हिल्स पाकिस्तान.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम कीव्हर्ड सर्च केल्यावर भारतासोबतच्या अलिकडच्या लष्करी संघर्षादरम्यान पाकिस्तानमधील कोणत्याही अणुसुत्रातून रेडिएशन गळती किंवा उत्सर्जन झाले नसल्याचे जागतिक अणुऊर्जा वॉचडॉग आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीने (IAEA) म्हटल्याचे आढळले. अधिक माहिती येथे, येथेयेथे वाचू शकता.

मूळ पोस्ट – द हिंदू

पुढे रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओ पाकिस्तानाचा नाही.

डेलीमोशनने 13 सप्टेंबर 2015 रोजी आपल्या वेबसाईटवर हाच व्हिडिओ शेअर केल्याचा आढळला. 

कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “येमेनमधील साना येथे आणखी एक मोठा स्फोट झाला आहे.”

मूळ पोस्ट – डेलीमोशन | आर्काइव्ह

हा धागा पकडून अधिक सर्च केल्यावर कळाले की, येमेनची राजधानी सानामध्ये सप्टेंबर 2015 मध्ये झालेल्या स्फोट आणि हवाई हल्ल्यामध्ये किमान 20 लोकांचा बळी गेला तर 36 जण जखमी झाले होते. या हल्ल्याची जबाबदारीही इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड द लेव्हंटने (आयएसआयएल) स्वीकारली होती. अधिक महिती येथे, येथेयेथे वाचू शकता.

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, पाकिस्तानमध्ये सध्याच्या काळात कोणतेही रेडियेशन लिक झाले नाही. व्हायरल व्हिडिओ सध्याचा नसून 2015 मध्ये येमेनची राजधानी सनामध्ये हा स्फोट झाला होता. भ्रामक दाव्यासह हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:पाकिस्तानमध्ये रेडियेशन लिक जाल्याचा दावा करत असंबंधित जुना व्हिडिओ व्हायरल

Fact Check By: SAGAR RAWATE 

Result: Misleading


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *