जेसीबीला धडक देणाऱ्या हत्तीचा व्हिडिओ हैदराबादचा आहे का ? वाचा सत्य

False Social

काही दिवसांपूर्वी तेलंगणा सरकारने हैदराबाद विद्यापीठाच्या (यूओएच) शेजारील असणाऱ्या सुमारे 400 एकर वनजमिनीचा आयटी पार्क बांधण्यासाठी लिलाव केला होता आणि जंगलतोडीसाठी अवजड वाहने पाठवली होती.

याच पाश्वभूमीवर सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक हत्ती जेसीबीला धडक दिल्यानंतर जखमी होतो आणि काही काळानंतर त्याचा उपचार केला जातो.

दावा केला जात आहे की, व्हायरल व्हिडिओमधील घटना हैदराबादची असून जेसीबी धडक देऊन हा हत्ती जखमी झाला आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. 

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ हैदराबादशी संबंधित नाही.

काय आहे दावा ?

व्हायरल व्हिडिओ सर्वप्रथम एका हत्तीची जेसीबीला धडक दिसते. त्यानंतर एका हत्तीच्या कपाळाला मोठी जखम दिसते. पुढे काही लोक त्या हत्तीच्या जखमेवर औषधी लावताना दिसतात.

युजर्सा हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “हैदराबाद येथील चारशे एकर जंगलावर सरकारने जेसीबी चालवलं होतं आपल्या जंगलाचे रक्षण करताना हत्ती जखमी झाला होता हत्तीवर उपचार सुरू झाले.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

खालील सर्व क्लिप रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओ वेगवेगळे क्लिप एकत्र करुन तयार करण्यात आला असून हैदराबादशी संबंधित नाही.

क्लिप क्र. 1

पश्चिम बंगालच्या जलपाईगुडीतील दमदिम भागात 1 फेब्रुवारी रोजी  हा हत्ती अन्नाच्या शोधात अपलचंद जंगलातून बाहेर आला तेव्हा ही घटना घडली होती.

अन्नाच्या शोधात असलेल्या या हत्तीचा स्थानिकांनी पाठलाग केला आणि त्रास दिला. ज्यामुळे हत्तीला राग आला आणि त्याने लोकांवर हल्ला केला. परंतु, हत्तीच्या हल्ल्याने कोणीही जखमी जाले नाही.

पुढे त्याने बांधकाम उपकरणे (जेसीबी) आणि जवळच्या वॉचटॉवरला लक्ष्य केले. यामध्ये त्याच्या कपाळाला दुखापत झाली होती. अधिक माहिती येथे वाचू शकता.

क्लिप क्र. 2

जानेवारी महिन्यात केरळ वन विभागाला त्रिशूर जिल्ह्यातील अथिराप्पिली जंगलात कपाळावर गंभीर दुखापत झालेला एका जंगली हत्ती आढळला.

सुरुवातीला हत्ती निरोगी आणि सामान्यपणे हालचाल करताना दिसला. परंतु, जसजशी जखम पसरत गेली आणि त्यात किडे येऊ लागले तसतसे हत्तीची तब्येत ढासळू लागली. अधिक महिती येथे वाचू शकता.

खाली आपण केरळ वन विभागाला द्वारे हत्तीवर उपचार करतानाचा व्हिडिओ पाहू शकतो.

परंतु, अभयरण्यम हत्ती छावणीत उपचारानंतरदेखील 21 फेब्रुवारी रोजी त्याचा मृत्यू झाला. संपूर्ण बातमी येथे वाचू शकता.

हैदराबादमधील सध्याची स्थिती

तेलंगणा सरकारने कांचा गचिबोवली हे जंगलाची सुमारे 400 एकर वनजमिनीचा लिलाव केल्यावर सर्वप्रथम हैदराबाद विद्यापीठाच्या विद्यार्थांनी या जंगलतोडी विरोधात आंदोलने केली. जंगलतोडीची अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर देशभरातून या निर्णयाचा विरोध करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयानेदेखील या जंगलतोडीला स्थगिती दिली आणि या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली. संपूर्ण बातमी येथे वाचू शकता.

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ हैदराबादशी संबंधित नाही. मुळात जेसीबीला टक्कर मारणाऱ्या हत्तीची क्लिप पश्चिम बंगाल आहे. तसेच जखमी हत्तीवर उपचार करतानाची क्लिप केरळची आहे. वेगवेगळे क्लिप एकत्र करुन कांचा गचिबोवली वनक्षेत्राशी जोडून व्हायरल केला जात आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:जेसीबीला धडक देणाऱ्या हत्तीचा व्हिडिओ हैदराबादचा आहे का ? वाचा सत्य

Fact Check By: SAGAR RAWATE 

Result: False


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *