
इराण-इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर युद्धाचे अनेक असंबंधित व जुने व्हिडिओ शेअर केले जात आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे फोटो आणि व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल होत असलेले हे व्हिडिओ आणि फोटो इराण-इस्रायल युद्धाचे नाहीत.
खाली दिलेल्या सर्व व्हिडिओंची सत्यता रिव्हर्स इमेजद्वारे सर्चद्वारे केलेली आहे.
व्हिडिओ क्र. 1
मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
सत्य –
व्हायरल व्हिडिओ 11 सप्टेंबर 2001 रोजी अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या ट्विन टॉवर्सवर झालेल्या हल्ल्याचा आहे. अधिक महिती येथे वाचू शकता.
फोटो क्र. 2
मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
सत्य –
द टाइम्स ऑफ इस्रायलच्या बातमीनुसार हा व्हिडिओ दोन वर्षांपूर्वीचा आहे. उत्तर इस्रायलमधील शहर सेफडमध्ये जून 2022 मध्ये सकाळच्या सुमारास अठरा बसेस पेटवून देण्यात आल्या. पोलिसांच्यामते ही ही जाळपोळ प्रायोजकत्व शुल्क वसूल करण्याच्या प्रयत्नातून केली गेली होती. व्हिडिओ येथे उपलब्ध आहे.
व्हिडिओ क्र. 3
मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
सत्य –
इस्रायलने फेब्रुवारी महिन्यात गाझामधील रफाह शहरावर केलेल्या हवाई हल्ल्यानंतरचा हा व्हिडिओ आहे. अधिक माहिती येथे व येथे वाचू शकता.
फोटो क्र. 4
मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
सत्य –
व्हायरल फोटो तेल अवीवमधील नाही. हा फोटो 23 मार्च रोजी मॉस्कोच्या क्रोकस सिटी हॉलमधील दहशतवादी हल्ल्याचा आहे. या हल्ल्यात 133 लोक मारले गेले, तर 140 अधिक जखमी झाले होते. अधिक महिती येथे व येथे वाचू शकता.
निष्कर्ष
यावरुन सिद्ध होते की, व्हायरल होत असलेले हे व्हिडिओ आणि फोटो इराण-इस्रायलचे नाहीत. असंबंधित आणि इतर ठिकाणांचे असून चुकीच्या दाव्यासह शेअर केले जात आहेत.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:इराण – इस्रायल संघर्षाच्या नावाने असंबंधित फोटो / व्हिडिओ व्हायरल; वाचा सत्य
Written By: Sagar RawateResult: Misleading
