राजीव गांधींच्या स्मृतिदिनाच्या दिवशी समर्थकांनी राहुल गांधींच्या फोटोचे पुजन केले का ? वाचा सत्य

False राजकीय | Political

काँग्रेस नेते आणि लोकसभा विरोधपक्ष नेते राहुल गांधी यांच्या छायाचित्राची पुजा करतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

दावा केला जात आहे की, “केरळमधील वायनाड जिल्ह्यात काँग्रेस समर्थकांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनाच्या दिवशी राहुल गांधींच्या फोटोचे पुजन केले.”

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल फोटो 5 वर्षांपूर्वीचा असून ओणम उत्सवादरम्यानचा आहे.

काय आहे दावा ?

व्हायरल फोटोमध्ये राहुल गांधींच्या छायाचित्रा समोर एक व्यक्ती दीप प्रज्वलित करताना दिसतो.

युजर्स हा फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “स्थळ: वायनाड, केरळ. जिल्हा काँग्रेस समितीचे कार्यालय. प्रसंग: राजीव गांधी यांची पुण्यतिथी. तात्पर्य : १००% साक्षरता असलेल्या राज्यात, या “शिकलेल्या” मूर्खांना हे देखील माहित नाही की बाप कोण आणि पोरगा कोण. जिवंत कोण आणि कोण मेलाय.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

कीव्हर्ड सर्च केल्यावर अशी कोणतीही बातमी माध्यामांवर आढळत नाही. तसेच रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर मुळ फोटो कुठला हे देखील कळाले नाही.

पुढे फॅक्ट क्रेसेंडोच्या मल्याळम टिमच्या माध्यमातून वायनाड मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्त्यांशी संपर्क साध्यावर कळाले की, व्हायरल फोटोमध्ये राहुल गांधीच्या छायाचित्रासमोर दीप प्रज्वलीत करणारी व्यक्ती तिरुवनंतपुरम डीसीसीचे सरचिटणीस विनोद सेन आहे.

मूळ पोस्ट – फेसबुक 

व्हायरल दाव्याचे खंडण

पुढे विनोद सेन यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी व्हायरल दाव्याचे खंडण करत सांगितले की, “व्हायरल फोटोसोबत केलेला दावा खोटा आहे. मुळात हा फोटो वायनाडचा नसून तिरुवनंतपुरमचा आहे. हा फोटो पाच वर्षांपूर्वी ओणम उत्सवानिमित्त आयोजित ‘किसान मार्केट’ कार्यक्रमातदरम्यानचा असून यामध्ये मीच दिवा लावताना दिसतो. 

तसेच एस.के. अशोक कुमार यांनी दीपप्रज्वलन करून ओणम बाजाराचे उद्घाटन केले होते. अशोक कुमार हे व्हायरल फोटोमध्ये माझ्या डावीकडील बाजूला आहेत. परंतु, फोटो काढताना ते कोणाशी तरी बोलताना मागे वळल्याने त्यांचा चेहरा दिसत नाही.

राहुल गांधी यांची प्रितिमा ठेवण्यामगचे कारण विचारले असता. विनोद सेन यांनी सांगितले की, “ सर्वप्रथम हा काँग्रेसचा कार्यक्रम असल्याने त्या ठिकाणी राहुल गांधी यांची प्रितिमा ठेवण्यात आली होती. तसेच दुसरी गोष्ट म्हणजे तिरुपूर कारशका काँग्रेसचे अध्यक्ष असलेले मित्रम लालू हे राहुल गांधींचे मोठे चाहते असल्या कारणाने त्यांनीच तिथे त्यांचा फोटो ठेवला होता.”

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, व्हायरल फोटोसोबत केलेला दावा खोटा आहे. 5 वर्षांपूर्वी  तिरुअनंतपुरममध्ये ओणम उत्सवानिमित्त काँग्रेस नेतृत्वाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात एका कार्यकर्त्याने राहुल गांधींच्या फोटोची पुजा केली होती. खोट्या दाव्यासह फोटो व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:राजीव गांधींच्या स्मृतिदिनाच्या दिवशी समर्थकांनी राहुल गांधींच्या फोटोचे पुजन केले का ? वाचा सत्य

Written By: Sagar Rawate  

Result: False