भारतीय उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करणाऱ्या बांगलादेशी व्यक्तीचा जुना व्हिडिओ व्हायरल

राजकीय | Political

बांगलादेशात काही दिवसांपासून होत असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती दुकानदारांना भारतीय उत्पादनांवर बहिष्कार टाकण्यास सांगत आहे.

दावा केला जात आहे की, बांगलादेशने “भारतीय उत्पादनांवर बहिष्कार घालण्याची” अनधिकृत मोहीम सुरू केली आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ 5 महिन्यांपूर्वीचा असून सध्या सुरू असलेल्या बांगलादेशमध्ये आंदोलनात भारतीय उत्पादनांवर बहिष्टकार टाकला असल्याचा दावा चुकीचा आहे.

काय आहे दावा ?

व्हायरल व्हिडिओमध्ये एक व्यक्ती दुकांदारांना पॅराशूट तेल, डाबर मध, उजाला वॉशिंग पावडर इत्यादी भारतीय उत्पादनांवर बहिष्कार टाकण्यास सांगत आहे.

युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, बांगलादेशने “भारतीय उत्पादनांवर बहिष्कार घालण्याची” अनधिकृत मोहीम सुरू केली.

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओ 5 महिण्यापूर्वीचा असून बांगलादेशमध्ये सध्या सुरू असलेल्या आंदोलनाशी संबंधित नाही.

तमन्ना फिरदौज शिखा नामक युजरने हा व्हिडिओ 22 फेब्रुवारी फेसबुकवर शेअर केला होता. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “दुकानात जाऊन भारतीय उत्पादने न घेण्याचा इशारा दिला.”

मूळ पोस्ट – फेसबुक 

तमन्ना शिखा यांनी 23 रोजीदेखील व्हिडिओमधील भारतीय उत्पादनांनवर बंदी घालण्याचे आवाहन करणाऱ्या व्यक्ती संबंधिक आणखी एक पोस्ट फेसबुकवर शेअर केली होता. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “तारेक रहमान यांनी शेणाने दिलेल्या मालावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले.”  

अर्थात व्हिडिओमधील व्यक्तीचे नाव तारेक रहमान आहे.

मूळ पोस्ट – फेसबुक

हा धागा पकडत अधिक सर्च केल्यावर कळाले की, तारेक रहमान हे लोक (गोनो) अधिकार परिषद या पक्षाचे नेते असून त्यांनी हा व्हिडिओ 22 फेब्रुवारी रोजी आपल्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर (तारेक्स टाइम) अपलोड केला होता.

तसेच तारेक रहमानांनी 19 फेब्रुवारी रोजी आपल्या तारेक/ लोक (गोनो) अधिकार परिषद या अधिकृत फेसबुक अकाउंटवरून भारतीय उत्पादनांची यादी शेअर करत बांगलादेशात या उत्पादनांवर बंदी घालण्याचे आवाहन करणारे पत्रक जारी केले होते.

मूळ पोस्ट – फेसबुक

बांगलादेशात भारतीय उत्पादनांवर बहिष्कार का घालण्यात येते?

एप्रिल महिन्यात विरोधीपक्ष बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीने (बीएनपी) भारत कथितरित्या बांगलादेशाच्या राजकारणात हस्तक्षेप करत असल्याचा आरोप केला होता.

याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षाने बांगलादेशमध्ये ‘बॉयकॉट इंडिया’ मोहीम सुरू केली होती. या मोहीमेत बांगलादेशामधील लोकांना भारतीय उत्पादानांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करण्यात आले होते.

तसेच बांगलादेशच्या तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांनी विरोधकांच्या ‘बॉयकॉट इंडिया’ मोहिमेचा विरोध केला होता. अधिक माहिती आपण येथेयेथे वाचू शकता.

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, व्हायरल होत असलेला व्हिडिओ 5 महिण्यांपूर्वीचा आहे. बांगलादेशमध्ये सध्या सुरू असलेल्या आंदोलनात भारतीय उत्पादनांवर बहिष्टकार टाकण्यात आलेला नाही. भ्रामक दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:भारतीय उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करणाऱ्या बांगलादेशी व्यक्तीचा जुना व्हिडिओ व्हायरल

Written By: Sagar Rawate  

Result: Misleading