
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये कचरा गोळा करणाऱ्या मुलांकडे 500 रुपयांच्या जुन्या नोटांचे बंडल दिसतात. दावा केला जाता आहे की, “हा व्हिडिओ पाकिस्तानाचा असून तेथे भारतीय चलनातून बाद झालेल्या 500 रुपयांच्या जुन्या नोटा अद्याप ही चलनात आहे.”
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ पाकिस्तानचा नसून भारतातील आहे.
काय आहे दावा ?
व्हायरल व्हिडिओमध्ये कचरा गोळा करणाऱ्या दोन मुलांकडे भारतीय चलनाच्या 500 रुपयांच्या जुन्या नोटांचे बंडल दिसतात.
युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “9 वर्षांपूर्वी बंद झालेल्या भारतातील 500 घ्या नोटा पाकिस्तानात आजही चालतात.”
मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
सर्व प्रथम आम्ही कीव्हर्ड सर्च केल्यावर पाकिस्तानामध्ये भारतीय चलनातील जुन्या नोटा वापरल्या जात असल्याची कोणतीही बातमी आढळत नाही.
रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओ पाकिस्तानमधील नाही.
अखी मिश्रा नामक युजरने 27 डिसेंबर 2024 रोजी हाच व्हिडिओ इंस्टग्रामवर शेअर केल्याचे आढळले.
अधिक सर्च केल्यावर ब्रिजेश मिश्रा नामक दुसऱ्या युजरने 1 जानेवारी रोजी हाच व्हिडिओचा स्क्रिनशॉट शेअर करत महिती सांगितले की, “हा व्हिडिओ त्यांनी काढला असून त्यांच्या पुतण्याच्या (अखी मिश्रा) अकाउंटवरून अपलोड करण्यात आला होता.”
तसेच त्यांनी व्हायरल क्लिपमध्ये मुलांना मागितलेल्या 500 रुपयांच्या नोटा खालील व्हिडिओमध्ये पाहू शकता.
पुढे, ब्रिजेश मिश्रा यांनी 2 जानेवारी रोजी एक व्हिडिओ शेअर केला. ज्यामध्ये त्यांनी व्हायरल क्लिपमधील कचरा गोळा करणाऱ्या मुलांशी आणि त्यांच्या आईची भेट घेतली.
खंडण
भ्रामक दाव्यासह ही क्लिप व्हायरल झाल्यानंतर ब्रिजेश मिश्रा यांनी 2 जानेवारी रोजी आपल्या युट्यूब चॅनलवर व्हिडिओ अपलोड करत स्पष्ट केले की, “व्हायरल व्हिडिओमधील दोन्ही मुल पाकिस्तानी नसून आसामचे आहेत. ते येथे लखनऊमध्ये हे (कचरा किंवा भंगार गोळा करण्याचे) काम करतात.”
निष्कर्ष
यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओमध्ये 500 रुपयांच्या जुन्या नोटांचे बंडल घेऊन जाणारे दोन्ही मुले लखनऊ येथील आहेत. पाकिस्तानमध्ये भारतीय चलनातील बंद झालेल्या नोटा चालत नाही. खोट्या दाव्यासह हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:कचरा गोळा करणाऱ्या मुलांकडे 500 रुपयांच्या नोटा सापडल्याचा व्हिडिओ पाकिस्तानातील नाही; वाचा सत्य
Fact Check By: SAGAR RAWATEResult: Misleading
